Omraje : फेसबुक कमेंट बॉक्स बंद करावा लागत असेल तर मुख्यमंत्री पदाचा उपयोग काय ?

शिवसेना आता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे, पण त्यांची तयारी काही होईना. जसा निवडणुकीला वेळ लागत आहे, तशी शिवसेनेची शक्ती वाढताना दिसते आहे. (Mp Omraje Nimabalkar)
Mp Omraje Nimabalkar-Cm Eknath Shinde News, Osmanabad
Mp Omraje Nimabalkar-Cm Eknath Shinde News, OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : राज्याचे सर्वोच्च पद मिळविल्यानंतरही आपल्या फेसबुकच्या कमेंटचा बॉक्स बंद करावा लागत असेल तर लोकांची भावना काय आहे हे समजायला हवे असा, टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नाव न घेता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimabalkar) यांनी लगावला. खोके, पेट्या लाथाडुन आम्ही निष्टेने पक्षाबरोबर राहिलो, कारण गद्दारी आमच्या रक्तात नाही, असेही त्यांनी सुनावले.

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या मराठवाडा दौऱ्याचा प्रारंभ तुळजापुर येथुन झाला. त्यानंतर (Osmanabad) उस्मानाबाद येथे मेळाव्यात बोलताना खासदार राजेनिंबाळकर यांनी जोरदार टोलेबाजी केली. एका अपेक्षेने मतदार लोकप्रतिनिधीना मतदान करतात, त्यांना निवडुन आणण्यासाठी हजारो कार्यकर्ते जीवाचे रान करतात. ज्या विश्वासाने आमदार, खासदार निवडुन येतो, त्या मतदाराला देखील आता खाली मान घालायची वेळ आली आहे.

आपल्या आमदाराला विकत घेतल्याची भाषा आता सामान्य मतदार करीत असेल तर त्यांची विश्वासार्हता काय राहणार? असा सवाल देखील ओमराजे यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना त्यानी नाव न घेता त्यांना टोला लगावला. फेसबुकच्या कमेंट पाहुन तो बॉक्सच बंद करावा लागत असेल तर त्या सर्वोच्च पदावर जाऊन तरी काय उपयोग?

Mp Omraje Nimabalkar-Cm Eknath Shinde News, Osmanabad
मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यात पैठणसाठी दोन हजार कोटींचा निधी दिला, ठाकरेंनी काय दिले?

मुख्यमंत्री पदाचा राजीनाम देऊन वर्षा बंगल्यावरुन उध्दव ठाकरे मातोश्रीकडे जात असताना राजकारणाशी ज्यांचा सबंध नाही अशा सामान्य लोकांचे, महिलांचेही डोळे पानावले होते. त्या अश्रुचा बदला ते घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा, इशाराही त्यांनी बंडखोर आमदार, खासदारांना दिला.

शिवसेना आता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे, पण त्यांची तयारी काही होईना. जसा निवडणुकीला वेळ लागत आहे, तशी शिवसेनेची शक्ती वाढताना दिसते आहे. निवडणुका कधीही घेतल्या तरी शिवसेना हमखास भरारी घेईल, असा विश्वास देखील ओमराजे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in