Abdul Sattar : केंद्राने पारदर्शकपणे चौकशी केली तर भाजपचे अर्धे नेते जेलमध्ये जातील..

राजकारणात काही लोकांचा पक्ष बंद पडायला आले असून त्यांच्या दुकानाही बंद पडल्या आहेत. काही लोकांची दुकाने बंद पडली असल्याने त्यांनी आता लाऊडस्पीकरची दुकाने सुरू केली आहेत. (Shivsena)
Abdul Sattar : केंद्राने पारदर्शकपणे चौकशी केली तर भाजपचे अर्धे नेते जेलमध्ये जातील..
State Minister Abdul SattarSarkarnama

औरंगाबाद : ईडी, सीबीआयचच्या धाड सत्रावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार असा संघर्ष सुरू आहे. याचा दाखला देत ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केंद्राने पारदर्शकपणे चौकशी केली तर भाजपचे अर्धे नेते जेलमध्ये जातील, अशी टीका केली आहे. फुलंब्री येथील पोलखोल सभेत बोलतांना सत्तार यांनी भाजपवर तोफ डागली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानूसार राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे जिल्ह्यात पोलखोल सभा घेत आहेत. काल फुलंब्री येथील सभेत सत्तार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. (Shivsena) सत्तार म्हणाले, भाजप सरकार महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांना टार्गेट करून महाराष्ट्राची बदनामी करीत आहे. (Aurangabad)

भाजपच्या या अनागोंदी कारभाराचा समाचार घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ८ तारखेला औरंगाबाद येथे सभा घेत आहेत. या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहा. भाजपाच्या विचारधारेवर केंद्रातील अधिकारी चौकशी करतात. केंद्राने जर खरोखरच पारदर्शकपणे सर्वच नेत्यांची चौकशी केली, तर अर्धे भाजपचे नेते जेलमध्ये जातील, असा इशारा देखील सत्तार यांनी दिला.

राजकारणात काही लोकांचा पक्ष बंद पडायला आले असून त्यांच्या दुकानाही बंद पडल्या आहेत. काही लोकांची दुकाने बंद पडली असल्याने त्यांनी आता लाऊडस्पीकरची दुकाने सुरू केल्याचा टोलाही सत्तार यांनी मनसेला लगावला.

State Minister Abdul Sattar
Dhnanjay Munde : अप्पा तुमच्या नावापुढे स्वर्गीय लावावे लागेल, असे कधी वाटले नव्हते..

फुलंब्री शहरासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना मिळवून देणार असून शहराला लागून असलेल्या पानवाडी येथे पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५ कोटी व तर फुलंब्री शहरातील विविध विकासकामांसाठी असे ७ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचेही सत्तार यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in