Asaduddin Owaisi : मुस्लिमांचे पुर्वज हिंदू होते, तर मग भागवतांचे पुर्वज बुद्धिस्ट होते का ?

केवळ जाती-धर्माचे राजकारण करण्याचा आणि देशातील वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार असल्याचेही ओवेसी म्हणाले. (Aimim)
Rss Chief Mohan Bhagwat- Asaduddin Owaisi
Rss Chief Mohan Bhagwat- Asaduddin OwaisiSarkarnama

नांदेड : आरएसएस आणि बजरंग दल हे एकच आहेत. मथुरा, ज्ञानवापी प्रकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उचलून धरले, तर अयोध्या, काशी, मथुरेचा मुद्दा लावून धरण्यासाठी बजरंग दलाची स्थापना झालेली आहे, असा आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे. देशातील मुस्लिम हे पुर्वीचे हिंदूच होते, या मोहन भागवत यांच्या विधानाचा देखील त्यांनी समाचार घेतला.

मुस्लीम पुर्वीचे हिंदू होते, तर मग हिंदू पुर्वीचे बुद्धिस्ट होते का ? असा सवाल देखील ओवेसी यांनी उपस्थित केला. (RSS) नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना ओवेसी यांनी ज्ञानवापी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली.

ओवेसी म्हणाले, मथुरा, ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण आरएसएसनेच उचलून धरले. तर दुसरीकडे अयोध्या, काशी आणि मथुरेचा मुद्दा उचलण्यासाठीच बजरंग दल निर्माण झाले आहे. बजरंग दल हे आरएसएचाच एक भाग असून एकाच नाण्याच्या त्या दोन बाजून आहेत.

मोहन भागवत वारंवार सांगतात की, या देशातील मुस्लिम हे पुर्वीचे हिंदुच होते, मग माझा त्यांना सवाल आहे, भागवत यांचे पुर्वज बुद्धिस्ट होते का ? त्यांच जबरदस्ती धर्मांतर करण्यात आले होते का? केवळ जाती-धर्माचे राजकारण करण्याचा आणि देशातील वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार असल्याचेही ओवेसी म्हणाले.

Rss Chief Mohan Bhagwat- Asaduddin Owaisi
Nanded : आमच्या मतांची गरज असेल तर संपर्क साधा , ओवेसींचे महाविकास आघाडीला आवाहन

भाजपच्या प्रवकत्याने मुस्लीम धर्मगुरुंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आखाती देशांकडून भारताचा निषेध केला जात आहे. कतारमध्ये भारताचे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांना व्हिजा नाकारण्यात आला, त्यामुळे जगभरात नामुष्की झाली. त्यानंतर भाजपने प्रवक्त्यांवर कारवाई केल्याची टीका देखील ओवेसी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com