Imtiaz Jalil : बाळासाहेब ठाकरे असते तर बंडाची हिमंत झाली नसती ? झाले ते वाईटच..

ज्या शिवसेनेने, बाळासाहेब ठाकरेंनी आणि आता उद्धव ठाकरेंनी अनेकांना आमदार, मंत्री केले त्यांनी आज पक्षाशी गद्दारी करत त्यांना कुठे तोंड काढायला जागा ठेवली नाही. (Aimim)
Mp Imtiaz Jalil-Let. Balasaheb Thackeray
Mp Imtiaz Jalil-Let. Balasaheb ThackeraySarkarnama

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार कुठल्याही क्षणी कोसळेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जवळपास अख्खी शिवसेनाच फोडली आहे. शिवसेनेत (Shivsena) झालेल्या या बंडाळीन राज्यातच नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे. एमआयएमने देखील या नाट्यावर भाष्य करत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर एकनाथ शिंदे आणि इतर आमदार, मंत्र्यांची अशी हिमंत झाली नसती, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी झाले ते वाईट झाले, असे म्हटले आहे.

शिवसेनेशी आमचे वैचारिक मतभेद असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे राज्यात विकासाचे राजकारण करत होते, अस कौतुक देखील त्यांनी केले. राज्यातील वेगवान घडामोडी आणि शिवसेनेतील बंडाळी संदर्भात `सरकारनामा`,शी बोलतांना इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी अनेक गोष्टींची शक्यता बोलून दाखवली.

हिंदुत्वाचा आधार घेत एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतच्या मंत्री, आमदरांनी केवळ पैसा आणि सत्तेसाठी आपल्याच पक्षाशी गद्दारी केली. त्यांना हिंदुत्वाशी काहीही देणेघेणे नाही. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने ज्या पद्धतीने या सगळ्या बंडखोरांची बडदास्त ठेवली, त्यांच्यासाठी चार्टड विमाने, पंचतारांकित हाॅटेलामध्ये राहणे, गाड्यांचा ताफा ठेवला ते पाहता या देशात काय चालले? असा प्रश्न पडतो.

वाईट या गोष्टीचे वाटते की ज्या शिवसेनेने, बाळासाहेब ठाकरेंनी आणि आता उद्धव ठाकरेंनी अनेकांना आमदार, मंत्री केले त्यांनी आज पक्षाशी गद्दारी करत त्यांना कुठे तोंड काढायला जागा ठेवली नाही. मंत्री, कुणी पाच वेळा, तीन वेळा आमदार राहिलेले, तर काहीजण तर पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार देखील या बंडात सहभागी झाले याचे आश्चर्य वाटते. शिवसेनेमुळे ज्यांना राजकारणात ओळख मिळाली असे आमदार सत्ता आणि पैशासाठी आपल्या पक्षाच्या मुळावर उठतात ही राज्याला आणि त्या पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे.

राज्यात सध्या जे सुरू आहे, असे यापुर्वी कधी घडले नव्हते, ती आपल्या राज्याची संस्कृती देखील नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकी नंतर लगेचच हे बंड कसे सुरू झाले यामागे देखील काही कारणे आहेत. आपल्या राजकीय आयुष्याची ३५-४० वर्ष भाजपमध्ये काढलेले आणि आता राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे हे देखील एक कारण या सगळ्या घडामोडींमागे असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला.

खडसे गृहमंत्री होणार होते..

राष्ट्रवादी काॅंग्रेसला खडसे यांना गृहमंत्री करायचे होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला, परंतु तो फसला आणि खडसे विजयी झाले. राष्ट्रवादीकडून लवकरच त्यांना गृहमंत्री केले जाणार होते. खडसे गृहमंत्री झाले असते तर भाजपची डोकेदुखी वाढली असती, त्यामुळेच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून हे बंड भाजपनेच घडवून आणले, असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला.

राज्यातील गुप्तचर विभाग नेमका काय करतो? हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा जातो, तिथे हल्ला होतो, तरी गुप्तचर विभागाला याची माहिती नव्हती.

Mp Imtiaz Jalil-Let. Balasaheb Thackeray
Shivsena : राष्ट्रवादी-काॅंग्रेसमुळे होणारे नुकसान उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही ..

आता सरकारमधील एक मोठा मंत्री सोबत ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन बंड पुकारतो, तरी याचा थांगपत्ता गुप्तचर विभागाला लागत नाही, याचे आश्चर्य वाटते. या बंडानंतर आता पुन्हा राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल, फडणीवस मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असा दावा देखील इम्तियाज यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com