आज निवडणूक झाली तर मराठवाड्यात भाजपच ठरणार मोठा पक्ष, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

(People have favored Shiv Sena with 12 seats at the second position.) ४८ पैकी २१ जागा म्हणजे जवळपास निम्या जागा या आताच्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला जातांना दिसतायेत.
Shivsena-Bjp
Shivsena-BjpSarkarnama

औरंगाबाद: राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. अनेक नैर्गिक संकट, कोरोनासारखी जागतिक महामारी आणि केंद्र सरकारच्या दबाव तंत्राचा सामना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची वाटचाल सुरू आहे. दोन वर्षात सरकारमध्ये असेल्या तीन्ही पक्षात फारशा कुरबुरी झाल्याचे देखील पहायला मिळाले नाही.

सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीवर आधारित सकाळसाम टिव्हीने केलेल्या सर्वेक्षणात देखील राज्यात आज निवडणुका झाल्या तर जनतेची पहिली पसंती ही महाविकास आघाडीलाच असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. यात विभागाचा विचार केला तर मराठवाड्या सारख्या महत्वाच्या भागात जिथे विधानसभेच्या ४८ जागा आहेत, तिथे मात्र भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असे या सर्व्हेतून दिसते आहे.

४८ पैकी २१ जागा म्हणजे जवळपास निम्या जागा या आताच्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला जातांना दिसतायेत. तर त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर १२ जागांसह शिवसेनेला लोकांनी पसंती दर्शवली आहे. मुंबई, कोकणानंतर शिवसेनेचे प्राबल्य मराठवाड्यात बऱ्यापैकी असले तरी भाजपने इथे आपली ताकद वाढवल्याचे दिसून आले आहे. राज्यातील सत्तातंरानंतर देखील भाजप मराठवाड्यातील आपली लोकप्रियता टिकवून असल्याचे या सर्वेतील आकडेवारीवरून दिसून येते.

शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येत असल्याने राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मराठवाड्यातील जनतेची पसंती मात्र शिवसेना-भाजप या अनेक वर्ष एकत्रित निवडणुका लढलेल्या पारंपारिक पक्षांना असल्याचे जाणवते. तर सध्या सत्तेत असलेल्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीला मात्र मराठवाड्यात फारसे यश मिळतांना दिसत नाहीये. काॅंग्रेसला सात तर राष्ट्रवादीला केवळ सहा जागा या सर्वेनूसार जिंकता येणार आहेत.

Shivsena-Bjp
जनतेचा कल पाहून आनंद; पण विरोधकांना कमी लेखून चालणार नाही : गोऱ्हे

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात या दोन पक्षांची पडझड झाली होती. अनेक दिग्गज, राज्याच्या सत्तेत मंत्रीपद भोगलेले नेते भाजपमध्ये गेल्यामुळे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची मराठवाड्यातील ताकद आणखी कमी झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com