धनंजय मुंडेंना मी सोडणार नाही : बीडमध्ये घर खरेदीनंतर करुणा शर्मांचे पुन्हा आव्हान

बबन गीते यांना अडकविण्याचा संपूर्ण प्लॅन माझ्या समोरच केला होता, असा आरोपही करुणा शर्मा यांनी आज केला.
Dhananjay Munde-Karuna Sharma
Dhananjay Munde-Karuna SharmaSarkarnama

बीड : ‘धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मी सोडणार नाही, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी आता बीडमध्ये आले (घर खरेदी केले आहे) आहे, त्यांनी माझ्याविरोधात लढण्याची तयारी करावी, असे आव्हान करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिले. (I will not leave Dhananjay Munde : Karuna Sharma's challenge after buying a house in Beed)

करुणा शर्मा-मुंडे यांनी बीडमधून निवडणूक लढविण्याचा ठाम निश्चय केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आज बीडमध्ये घर खरेदी केले असून त्यांची नोंदणीही रजिस्ट्रेशन कार्यालयात करण्यात आली आहे. नोंदणी झाल्यानंतर माध्यामांशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंना आव्हान दिले.

Dhananjay Munde-Karuna Sharma
निवडणुका लढवणं अन राजकारण करणं हा आमचा धंदा नाही : राजू शेट्टींचा सावध पवित्रा

करुणा शर्मा म्हणाल्या की, खोट्या केसमध्ये अडकवून मला वर्षभरापूर्वी बीडमध्ये कारागृहात टाकण्यात आले होते. सत्तेचा दुरुपयोग करून त्यावेळी मला जेलमध्ये टाकण्यात आले होते. त्याचवेळी मी ठरवलं होतं की, घाणीत उतरुनच मी ही घाण साफ करणार. बीडमध्ये येऊन त्या विरोधात लढा देण्यासाठी मी आज बीडमध्ये घर खरेदी केले आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मी सोडणार नाही. धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्याची मी संपूर्ण तयारी केली आहे, त्यांनीही माझ्याशी लढण्याची तयारी करावी. त्यासाठीच आज मी बीडमध्ये आले आणि घर खरेदी केले आहे.

Dhananjay Munde-Karuna Sharma
शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल; पुढील तीन दिवस उपचार घेणार

बीडचे नागरिक आज माझ्यासोबत आहेत. बीडच्या जनतेवर माझा एवढा विश्वास आहे की, येथील जनतेने कायम न्याय केला आहे. धनंजय मुंडे असो की करुणा मुंडे. बीडच्या जनतेने नेहमी न्याय केला आहे. आज मी एकटी नाही. धनंजय मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांना खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकले आहे, हे बीडच्या जनतेला माहिती आहे. शिवराज बांगर, बबन गीते यांना धनंजय मुंडेंनी जेलमध्ये टाकले. बबन गीते यांना अडकविण्याचा संपूर्ण प्लॅन माझ्या समोरच केला होता, असा आरोपही करुणा शर्मा यांनी आज केला.

Dhananjay Munde-Karuna Sharma
राणांसोबतच्या वादानंतर शरद पवारांचा फोन आला होता का? बच्चू कडूंनी दिले हे उत्तर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com