
बीड : मला सगळे विचारतात, तुमचं काय भविष्य आहे? उद्या काय होणार आहे, तुम्हाला काय मिळणार, पण मला याची अजिबात चिंता नाही. तुम्ही माझी चिंता करू नका. दिलेल्या संधीचं सोनं करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचं मला सोनं करता आलं, याएवढी पुण्याई कुणाकडे आहे, असा प्रश्न करून हा पराभव मला दिल्लीपर्यंत, शिवराज सिंह चौहान यांच्या मध्य प्रदेशपर्यंत घेऊन गेला, असे स्पष्ट मत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावरून व्यक्त केले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावरील कार्यक्रमात त्या बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. पंकजा मुंडे म्हणाल्या, ''मला सगळे विचारतात, तुमचं भविष्य काय आहे. उद्या काय होणार, तुम्हाला काय मिळणार. पण, मला याची खरंच चिंता नाही. तुम्ही माझी चिंता करू नका. दिलेल्या संधीचे सोनं करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत.''
माझ्या पराभवाचेही मला सोनं करता आलं, याच्या एवढी पुण्याई कुणाकडे आहे. हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या सरळ स्वभावाच्या सात्विक मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला खूप काही शिकवून गेला. तुमच्या सेवेसाठी अविरत काम करणार आहे. मंचावरील कोणी आपलं भविष्य घडवू किंवा बिघडवू शकत नाही. तुम्ही आहात जे एखाद्याचं भविष्य घडवू किंवा बिघडवू शकतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आता जे सरकारमध्ये चाललंय, जे टीव्हीवर पाहायला मिळतंय. त्याविषयी मनामध्ये मला विषाद वाटतो. जात, धर्म व्यक्तीगत हेवे दावे, याच्यापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करण्यासाठी आणि देशात मुंडे साहेबांसारखं नाव करण्यासाठी तुमचे आशीर्वाद लाभू द्यात, अशी मागणीही पंकजांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.