मी नाॅनव्हेज सोडले, पण तो किस्सा अजूनही आठवतो..

प्लेटमध्ये भाकरी वाढून घेतली आणि डब्यात चमचा टाकून शोधू लागले पण त्यात मटनाचा एकही पीस नव्हता. (Pankaja Munde)
Bjp Leader Pankaja Munde

Bjp Leader Pankaja Munde

Sarkarnama

मुंबई ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे नुकत्याच एका चित्रवाहिनीच्या मंनोरजनात्मक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. (Pankaja Munde) खाद्यपदार्थांची रेसीप बनवण्याच्या स्पर्धेत पंकजा यांनी प्रत्यक्षात घडलेला एक किस्सा सांगितला आणि तिथे उपस्थितीत सगळ्यांनाच खळखळून हसू आले.

आपल्या खाण्या-पिण्याच्या आवडीविषयी सांगतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पुर्वी नाॅनव्हेज खायचे पण गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद केले. (Beed) परळी वैजनाथ हे ज्योतीर्लिंग असल्याने श्रावणात आमच्याकडे कुणीच मासांहार करत नाही. (Bjp) एकदा गटारी आमावस्येच्या दिवशी घरी निघाले तेव्हा साधरणतः रात्री दहा साडेदहाच्या सुमारास माझ्या एका कार्यकर्त्याचा मला फोन आला.

तो म्हणाला, ताई आज गटारी आहे, मी तुम्हाला छान रस्सा पाठवतो. मी म्हणाले ठीक आहे पाठव. घरी गेले आंघोळ करून तयार होईपर्यंत पावणे बारा वाजले होते. म्हणजे पंधराच मिनिटे शिल्लक होती, त्यामुळे मी घाईघाईने डबा उघडला. प्लेटमध्ये भाकरी वाढून घेतली आणि डब्यात चमचा टाकून शोधू लागले पण त्यात मटनाचा एकही पीस नव्हता.

मी त्या कार्यकर्त्याला फोन केला, म्हणाले अरे तू रस्सा पाठवलास पण त्यात मटनाचे पीसच नाही. तेव्हा तो म्हणाला, ताई मी तुम्हाला फक्त रस्सा पाठवतो म्हणून सांगितंल होतं. म्हणून फक्त रस्साच पाठवला. मग काय मला माझी गटारी आमावस्या फक्त रस्सा आणि भाकरीवरच साजरी करावी लागली. पण त्यानंतर मी महिनाभर त्या कार्यकर्त्याला सुनावत होते. हा किस्सा ऐकताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून पंकजा यांच्या या आठवणीला दाद दिली.

<div class="paragraphs"><p>Bjp Leader Pankaja Munde</p></div>
रोहित पवारांची ऑफर; पंकजा मुंडेंनी विचार केला तर त्यांच्यासाठी खुर्ची सोडू!

बाबा माझी काळजी घ्यायचे..

रेसीपी बनवतांना आज इथे तुमचे बाबा असते तर त्यांच्या प्रतिक्रिया काय असती? असे विचारले तेव्हा, पंकजा मुंडे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, बाबा आज खूप नर्व्हस झाले असते. मी जेव्हा कुठे कार्यक्रमात बोलायचे, भाषण करायचे तेव्हा ते नर्व्हस व्हायचे. एक नेता म्हणून नाही तर पिता म्हणून.

मला आठवते जेव्हा मी परळीला जाण्यासाठी निघायचे आणि नगर क्राॅस केल्यावर मला अस जाणावयंच की आपल्या गाडी मागे दोन-तीन गाड्या येत आहेत. मी चौकशी केली तेव्हा मला सांगितलं जायचं की मुंडे साहेबांनी सांगितले आहे, की पंकजा परळीला निघाली आहे, तिला घरी सोडून या. ते माझी खूप काळजी घ्यायचे, आजही ते इथे असते तर मी पदार्थ कसा बनवते याकडे कटाक्षाने लक्ष देवून माझाच पदार्थ चांगला व्हावा, असे त्यांना निश्चितच वाटले असते, असेही पंकजा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com