Fadanvis : औरंगाबादकरांना मी १६८० कोटींची पाणी योजना दिली , पण या नाकर्त्या सरकारने ती रद्द केली..

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना १६८० कोटींची योजना दिली होती. सगळा पैसा राज्य सरकार देणार होते, महापालिकेने फक्त एक रुपया द्यायचा होता. (Devendra Fadanvis)
Fadanvis : औरंगाबादकरांना मी १६८० कोटींची पाणी योजना दिली , पण या नाकर्त्या सरकारने ती रद्द केली..
Bjp Leader Devendra FadanvisSarkarnama

औरंगाबाद : शहरात पाणी प्रश्नावरून भाजप आणि मनसेने आंदोलन हाती घेत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. (Bjp) योजना लांबत असल्याने शिवसेनेचाही नाईलाज झाला. पण कुरघोडीचे राजकारण आणि स्पर्धा यामध्ये औंरगाबादचे नागरिक मात्र भरडले जात आहेत. धरण उशासी असून देखील घशाला कोरड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्मंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविका आघाडी सरकारला दोषी ठरवले आहे.

` मी मुख्यमंत्री असतांना शहराच्या पाण्यासाठी १६८० कोटींची योजना दिली होती. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ही योजना रद्द केली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. प्रसार माध्यमांनी मराठवाड्यातील (Marathwada) औरंगाबाद, लातूर आणि विदर्भात पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात विचारले तेव्हा फडणवीस म्हणाले, राज्याच्या हिताच्या आम्ही सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या.

औरंगाबादकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना १६८० कोटींची योजना दिली होती. सगळा पैसा राज्य सरकार देणार होते, महापालिकेने फक्त एक रुपया द्यायचा होता. पण राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि त्यांनी ही योजना रद्द करून नवीन योजना आणली. ज्या महापालिकेकडे कर्मचाऱ्यांचे पगार करायला पैसे नाहीत, त्या महापालिकेला नव्या योजनेत ६०० कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे.

Bjp Leader Devendra Fadanvis
Bjp : तीन दिवस, ६५ तास, तीन राष्ट्र, आठ नेते अन् २५ बैठका .. मोदींच्या विदेश दौऱ्याचे कौतुक

महापालिका हे पैसे भरूच शकत नाही, त्यामुळे जायकवाडी धरणात मुबलक पाणी असून देखील नागरिकांना पाणी देता येणार नाही अशी परिस्थिती आहे. बरं जी नवी योजना सरकारने आणली आहे, तिचे काम देखील रखडले आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी जी वणवण करावी लागत आहे, रस्त्यावर उतरावे लागत आहे, त्याला केवळ महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in