Chikhlikar : पोलिसांवर विश्वास राहिला नाही, पाच दिवसांत आरोपी शोधा नाहीतर रस्त्यावर उतरू..

नादंडे जिल्ह्यात व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढले. (Pratap Patil Chikhlikar)
Let.Sanjay Biyani-Pratap Patil Chikhlikar
Let.Sanjay Biyani-Pratap Patil ChikhlikarSarkarnama

नांदेड : शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची काल दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. (Nanded) या हत्येने संपुर्ण जिल्हा हादरून गेला असून कायदा व सुव्यवस्थेवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. बियाणी यांच्यावर आज हजारो नांदेडकरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Marathwada) पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बियाणी कुटुंबियांची भेट घेतली तर जिल्ह्याचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) हे अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

त्यानंतरच्या शोकसभेत बोलतांना चिखलीकर यांनी नांदेड पोलिसांवर आता आपला विश्वासच उरलेला नसल्याचे म्हणत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले. तर पाच दिवसांत पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेतला नाही, तर आपण रस्त्यावर उतरू अशा इशारा दिला. तर दुसरीकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत कुठल्याही परिस्थिती हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्याशिवया राहणार नाही. नांदेडमध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत पोलिसांना सूचना केल्या आहेत.

नादंडे जिल्ह्यात व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढले. बिल्डर संजय बियाणी यांची हत्या देखील खंडणीच्या मागणीतून झाली असल्याची चर्चा असली तरी यावर पोलिस अधिकृतरित्या काही बोलायला तयार नाहीत. व्यापारी, उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर आता बियाणी यांच्या हत्येवरून चिखलीकरांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: पालकमंत्री चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

Let.Sanjay Biyani-Pratap Patil Chikhlikar
Aurangabd : भाजपचा स्थापना दिवस, अन् उत्साही बागडेंची बाईक स्वारी..

दरम्यान, बियाणी यांची जी निर्घण हत्या झाली आहे, ती चितेंचा विषय आहे. ही हत्या कुणी केली, कशासाठी केली, यामागचे सूत्रधार कोण? याचा तपास लवकर लागावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाय उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि डीजींसोबत देखील या विषयावर चर्चा करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com