मी धनंजय बोलतोय, तुम्ही सुरक्षित आहात का ? पुरात अडकलेल्या नागरिकांना मुंडेंचा फोन

(Beed Gardian Minster) किती जण व कुठे अडकलेले आहात? (Dhnanjay Munde Phone Call) बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका
Dhananjay Munde, Beed
Dhananjay Munde, BeedSarkarnama

अंबाजोगाई : `मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना ? किती जण व कुठे अडकलेले आहात? बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका, अशा शब्दांत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर दिला. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अनेक नागरिक अडकल्याची माहिती मिळताच मुंडे यांनी या सर्वांची फोन करून चौकशी केली, तसेच त्यांच्या मदतीसाठी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले.

देवळा येथील ५१ जण मांजरा नदीच्या पुरात अडकले होते, यापैकी २७ जणांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर उर्वरित नागरिकांना सुरक्षा रक्षक जवान बोटीने बाहेर काढत आहेत. मांजरा नदीच्या काठी पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या गावांना धनंजय मुंडे यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची व नुकसानीची पाहणी केली.

एनडीआरएफसह अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली. मागील २४ तासात जिल्ह्यात सर्वदूर तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये घरात पाणी शिरल्याने नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.

रात्रभर आपण जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून दर तासाला जिल्ह्यातील एकूण उपाययोजनेची व उपलब्ध यंत्रणांची माहिती घेत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. एनडीआरएफसह अन्य बचाव पथकांना आवश्यक सूचना देण्यात येत असून एनडीआरएफ, अग्निशमक दलासह पथके बचाव कार्यात तैनात करण्यात आली आहेत. हेलिकॉप्टर उडायला वातावरण पूरक नसले तरी त्याचीही तयारी करून ठेवली आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

सरसकट मदत देऊ..

काल रात्रीच आपण या संपूर्ण परिस्थिती बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना जिल्ह्यातील एकूण परिस्थितीची माहिती देखील दिली आहे. मागील पंधरवाड्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करताना आकडेवारी बदलत आहेत.

मात्र आता काही महसूल मंडळांमध्ये शेतीमध्ये काहीच उरले नाही. अक्षरशः जमीन खरडून गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde, Beed
मरगळ झटकून नव्याने सुरूवात करा ; पुन्हा यश मिळवा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com