राष्ट्रपती, पंतप्रधान व दहा कोटी सदस्य असलेल्या भाजपचा सदस्य असल्याचा मला अभिमान..

राष्ट्रवादी विचार धारा आणि अंत्योदय या धोरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची वाटचाल देशात सुरू आहे. (Raosaheb Danve)
Central State Minister Raosaheb Danve
Central State Minister Raosaheb DanveSarkarnama

औरंगाबाद : ज्या देशाचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सर्वाधिक खासदार, आमदार आणि दहा कोटी सदस्य आहे, अशा भाजपचा (Bjp) मी सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. (Marathwada) भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून राष्ट्रवादी विचारधारा आणि अंत्योदय तत्वार चालणाऱ्या पक्षाचा म्हणजेच भाजपचा आज स्थापना दिवस आहे, त्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजप स्थापना दिना निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दिल्लीत पक्ष कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे मंत्री, पदाधिकारी, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी सर्वांना शुभेच्छा देत आपण भाजपचे सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे.

आपल्या व्हिडिओ संदेशात दानवे म्हणाले, देशात आज सर्वत्र भाजपचीच चर्चा आहे, आमचा पक्ष हा देशात आणि जगात देखील सर्वाधिक मोठा असा पक्ष आहे आणि त्याचा मी एक सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. आमच्या जुन्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या रक्त आणि घामातून हा पक्ष तयार झालेला आहे. आज देशात सर्वाधिक खासदार, आमदार हे भाजपचे आहेत.

Central State Minister Raosaheb Danve
Aurangabad : मनसेकडून भाजपला स्थापना दिनाच्या शुभेच्छा..

देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्षपदावर भाजपचे सदस्य विराजमान आहेत. राष्ट्रवादी विचार धारा आणि अंत्योदय या धोरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची वाटचाल देशात सुरू आहे. अशा या पक्षाचा आज स्थापना दिवस आहे.

या निमित्ताने मी देशभरातील दहा कोटीहून अधिक सदस्यांना शुभेच्छा देतो. पंतप्रधान मोदी हे दिल्लीत कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, त्याचे विचार आपण ऐका आणि मोठ्या संख्येने भाजपचे सदस्य व्हा, असे आवाहन देखील दानवे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com