Dhnanjay Munde : भल्याभल्यांना शक्य नाही ते राजेश्वर चव्हाण मोठ्या पवारांना बोलू शकतात

आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढविणार आणि जिंकणार असा विश्वास मला आहे. पक्षात लुडबुड करणारे, पक्ष अडचणीत असताना पळ काढणारे बरेचजण असतात. (Dhnanjay Munde)
Dhnanjay Munde- Rajeshwar Chavan,Beed
Dhnanjay Munde- Rajeshwar Chavan,BeedSarkarnama

बीड : राजेश्वर चव्हाण साधे नाहीत, ज्या उजनी गटातून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे व माझी राजकीय कारकिर्द सुरु झाली त्या जिल्हा गटातून ते ३० वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. (Beed) महाराष्ट्रात भलेभले आणि अगदी जवळचेही जेष्ठ नेते शरद पवारांना बोलू शकत नाहीत ते फक्त राजेश्वर चव्हाणच बोलू शकतात, अशा शब्दात पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी चव्हाण यांचे महत्व अधोरेखित केले. (Marathwada)

राष्ट्रवादीचे नुतन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी शनिवारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर पदभार स्विकारला. यावेळी मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, माजी आमदार सय्यद सलिम, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वी पार पार पाडल्याचा मी साक्षीदार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली लढविणार आणि जिंकणार असा विश्वास मला आहे. पक्षात लुडबुड करणारे, पक्ष अडचणीत असताना पळ काढणारे बरेचजण असतात. मात्र, राजेश्वर चव्हाण पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहेत.

Dhnanjay Munde- Rajeshwar Chavan,Beed
Dhnanjay Munde : हात जोडतो, माझ्यावर वार करा पण मायभूमीला बदनाम करु नका

पक्षवाढीसाठी त्यांनी आखलेल्या प्रत्येक रणनितीत आपण योगदान देऊ असे मुंडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पक्षवाढीसाठी जिल्हाभर तालुका निहाय दौरे काढणार असून जिल्ह्यात पक्ष कायम क्रमांक एकला राहील असा विश्वास राजेश्वर चव्हाण यांनी पदभार स्वीकारतांना उपस्थितांना दिला. जिल्हा कायम शरद पवारांच्या विचारांना माणणारा असल्याने आगामी निवडणुकांतही राष्ट्रवादीचाच विजय होईल, असेही चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com