मी शेअरहोल्डर, मालक नाही; सोमय्यांना जमीनीसह कारखाना शंभर कोटींत द्यायला सांगतो

(Shivsena Leader Arjun Khotkar clarification) मी कारखान्याचा मलाक नाही, तर ७० लाखांचा फक्त शेअरहोल्डर असल्याचा खुलासा, शिवेसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.
मी शेअरहोल्डर, मालक नाही; सोमय्यांना जमीनीसह कारखाना शंभर कोटींत द्यायला सांगतो
kirit somaiya-Arjun KhotkarSarkarnama

जालना ः भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत. ज्या जालना सहकारी साखर कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ते माझ्यावर करत आहेत, तो धादांत खोटा आहे. मी कारखान्याचा मलाक नाही, तर ७० लाखांचा फक्त शेअरहोल्डर असल्याचा खुलासा, शिवेसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन अर्जून खोतकर यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा करत जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना व कारखान्याची शंभर एकर जमीन हडपल्याचा आरोप केला. या आरोपाला खोतकर यांनी उत्तर दिले.

खोतकर म्हणाले, किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने उठसूठ विरोधकांवर आरोप करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे ते प्रामाणिकपणे ती जबादारी पार पाडत आहेत. त्यांनी केलेले आरोप खोटे आणि हास्यास्पद आहेत. ज्या कारखान्याचा ते उल्लेख करत आहेत, तो रामनगरचा जालना सहकारी साखर कारखाना माझ्या मालकीचा नाही, मी त्याचा फक्त शेअरहोल्डर आहे.

मुळात सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत माझ्यावर काय आरोप केले हे मी पाहिलेले नाही. तुम्ही सांगता त्यावरून मी तुम्हाला हे सांगतोय. शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप असेल तर मी जमीनीसह तो कारखाना सोमय्या यांना विकत द्यायला सांगतो. कंपनीचे मालक माझ्या परिचयाचे आहेत, त्यांच्याशी बोलतो आणि कारखाना त्यांना घेऊन देतो, असे आव्हान खोतकर यांनी सोमय्या यांना दिले.

सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, त्यांनी काहीही बोलायचे आणि त्यावर मी उत्तर द्यायचे, असे होणार नाही. योग्यवेळी मी त्यांना उत्तर देईन. ते तपास यंत्रणेचा, न्यायालयाचा भाग नाहीत, असेही खोतकर म्हणाले.

kirit somaiya-Arjun Khotkar
चंद्रकांत पाटील म्हणतात; कृषी कायद्यांचे महत्व समजावून सांगून पुन्हा अंमलात आणावेत

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in