अर्जुन खोतकरांच्या चेहऱ्यावर शंभर कोटींचे टेन्शन! जाणून घ्या प्रकरण..

Arjun Khotkar| Shinde GrouP| शिवसेनेतील एकापाठोपाठ एक आमदार, खासदार शिंदे गटात सामील होण्यामागे ईडीचे कारण सांगितले जात आहे.
Arjun Khotkar News
Arjun Khotkar NewsSarkarnama

जालना : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीनंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र खोतकर यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेतील एकापाठोपाठ एक आमदार, खासदार शिंदे गटात सामील होण्यामागे ईडीचे कारण सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतील नेत्यांप्रमाणे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावरही शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची ईडीने चौकशीही केली होती. अशात आजच्या घडामोडींनंतर, संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, असे सुचक वक्तव्य त्यांनी केले. खोतकरांच्या या प्रतिक्रियेमुळे ते शिवसेना कुठल्या दबावामुळे सोडत आहेत का, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Arjun Khotkar News
शिवसेनेचे माजीमंत्री अर्जुन खोतकरांची ईडीकडून बारा तास चौकशी

अर्जुन खोतकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होणारा जालना सहकारी साखर कारखान्यातील कथित घोटाळा

नेमके प्रकरण काय?

1984 मध्ये उभारण्यात आलेला जालना सहकारी साखर कारखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज कंपनीच्या मालकीचा आहे. या कारखान्याचे तब्बल 10 हजार सभासद आणि मोठी जमीनही आहे. अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जुगलकिशोर तापडिया यांना हा कारखाना कागदोपत्री विकण्यात आला. मात्र, त्यासाठी लागणारा पैसा अर्जुन शुगर्सकडून देण्यात आला. जुगलकिशोर तापडिया यांनी स्वत:च त्यांच्या व्यवहारविषयक कागदपत्रात तसं म्हटलही आहे. याशिवाय या जमिनीच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. माणिकराव जाधव यांनी या प्रकरणाविरोधात पहिली तक्रार केली होती.

Arjun Khotkar News
सोमय्यांनी आरोप करताच माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

जालना सहकारी साखर कारखान्याचा लिलाव ?

त्यानंतर थकीत कर्ज वसुलीचे कारण देत जालना सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. जालन्यातील रामनगर येथील कारखान्याची 200 एकर जमीन, इमारत आणि मशीन अशी मालमत्ता केवळ 42 कोटी 31 लाख रुपयांमध्ये विकण्यात आली. या व्यवहारानंतर ईडीने या मालमत्तेचे सर्वेक्षण करून मोजणी केली तेव्हा त्याची किंमत 78 कोटी 38 लाख रुपये असल्याची माहिती समोर आले.

शंभर कोटींचा घोटाळा?

अर्जून खोतकर यांनी जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने फसवणूक करून खरेदी केला. यात त्यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला, एवढेच नाही तर राज्य सरकारच्या मालकीची, शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी दिलेली तब्बल एक हजार कोटी किमंत असलेली शंभर एकर जमीन हडपण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीने खोतकरांचे जालन्यातील निवासस्थान, अनेक कागदपत्रे, खोतकर बिजनेस सेंटरसह, रामनगर साखर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी ईडीने केली. या प्रकरणी ईडीकडून (ED) अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली.

हजारे, पाटकरही आक्रमक

जालन्यातील साखर कारखान्याच्या घोटाळ्या प्रकरणी भाजप पूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर यांनीही या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. जुगलकिशोर तापडिया यांच्यानंतर आता पद्माकर मुळे यांनी या कारखान्याची खरेदी केलीय. कायद्यातील तरतुदींचा भंग करुन या कारखान्याचा लिलाव आणि विक्री आली. तसेच कारखान्याची जप्त केलेली मालमत्ता खोतकरांशी संबंधित असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in