पंकजा मुंडे उद्या पाथर्डीत कार्यकर्त्यांची समजूत काढणार की अस्वस्थता उफाळणार?

Pankaja Munde : विष प्राशन केलेल्या कार्यकर्त्याची भेट पंकजा मुंडे घेणार आहेत.
पंकजा मुंडे उद्या पाथर्डीत कार्यकर्त्यांची समजूत काढणार की अस्वस्थता उफाळणार?
Pankaja Munde latest NewsSarkarnama

अहमदनगर : आज (ता. 20 जून) पार पडत असलेल्या विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council elections) उमेदवारी डावलल्यानंतर भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अद्यापही कमालीचे मौन बाळगले आहे. मात्र, त्यांचा उद्या (ता.21 जून) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालू्क्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांना पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याने त्यांच्या नाराज सर्थकांची त्या कशी समजूत काढतात की, आपली नाराजी दौऱ्यादरम्यान व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. (Pankaja Munde latest Marathi News)

Pankaja Munde latest News
फडणवीसांनी शेवटच्या क्षणी स्ट्रॅटेजी बदलली; लाडांना केले सेफ, खापरे "डेंजर' झोनमध्ये?

भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उभ्या करण्यात आलेल्या पाच उमेदवारांमध्ये पंकजा यांच नाव जवळपास निश्चित होते,अशी चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. मात्र, त्यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. तरी पंकजा यांनी संयम दाखवत याबाबत काहीही न बोलता मौन बाळगलं आहे. संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, असे सूचक वक्तव्य पंकजा यांनी केलं होत. यानंतर त्यांच नाव डावलण्यात आलं त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोलल जात आहे.

भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आपला रोष जाहीर व्यक्त केला होता. यामध्ये काहींनी निदर्शनं , रास्ता रोको, तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून आपली धुसपूस बोलून दाखवली होती. तर पाथर्डीच्या एका कार्यकर्त्याने थेट विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. पाथर्डीमध्ये पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दरम्यान विधान परिषदेच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या प्रथमच दौऱ्यावर जात असून या दौऱ्यादरम्यान त्या आपले समर्थक विष प्राशन केलेले मुकुंद गर्जे यांना भेटतील आणि मोहटा देवीचंही दर्शन घेतील अशी माहिती समजते.

Pankaja Munde latest News
अजित पवार यांनी केले सर्वात शेवटी मतदान पण वाढवलं काॅंग्रेसचे टेन्शन!

पंकजा यांच्या उद्याच्या दौऱ्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते कामाला लागले असून पाथर्डी शहरात मोठ्याप्रमाणात कमानी आणि फ्लेक्स लावण्यात आले आहे. तसेच मोहटादेवी मंदिर परिसरातही स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे.

Pankaja Munde latest News
धनंजय मुंडे नैराश्याच्या गर्तेत, तणावामुळे ब्रेन स्ट्रोक ; आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

दरम्यान, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी डावलल्यानंतर शिवसेना आणि इतर काही पक्षांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली होती. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी वेगळा पक्ष काढण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, पंकजा यांचे याबाबतचे मौन कायम आहे. त्यांनी घेतलेल्या संयमाच्या भूमिकेचे समर्थन करणाराही एक गट आहे. मात्र, उद्याच्या कार्यक्रमात आपल्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार की, आपली अस्वस्थता बोलून दाखवणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. पंकजा यांनी जर आपली नाराजी बोलून दाखवली तर राज्याच्या राजकीय वर्तूळात राजकीय भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in