Aurangabad : एका प्रभागात किती वाॅर्ड ? आदेशात स्पष्टता नसल्याने महापालिका प्रतिक्षेत ..

महापालिका क्षेत्रात ११५ वॉर्ड आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून वॉर्डांची संख्या १२६ केली होती. पण सत्तांतरानंतर वॉर्डांची संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. (Municipal Corporation)
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation NewsSarkarnama

औरंगाबाद : रखडलेल्या महापालिका निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश शासनाने महापालिकेला दिले आहेत. पण त्यात एका प्रभागात किती वॉर्ड घ्यायचे? यासह कुठलेही स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाला आता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.

Aurangabad Municipal Corporation News
Marathwada : भुमरेंच्या `नुसता इक्कास`ची अंधारेंनंतर रोहित पवारांकडूनही चिरफाड..

महापालिकेच्या (Municipal Corporation) रखडलेल्या निवडणूका केव्हा होणार? याविषयी राजकीय पक्षांसह नागरिकांना उत्सुकता आहे. त्यात मंगळवारी (ता. २२) रात्री शासनाने आयुक्तांच्या नावे आदेश काढून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. (Aurangabad) त्यामुळे आगामी फेब्रुवारी, मार्च महिन्यात महापालिकेच्या निवडणूका होऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रभाग रचनेबद्दलचे आदेश प्राप्त झाले आहेत, पण प्रभाग रचना कशी करायची याची स्पष्टता नाही. त्यामुळे स्पष्ट आदेशाची आम्ही वाट पाहात आहोत. तसे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु केली जाईल.

२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार महापालिकेची निवडणूक झाल्यास चार वॉर्डांचा एक प्रभाग होऊ शकतो. महापालिका क्षेत्रात ११५ वॉर्ड आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून वॉर्डांची संख्या १२६ केली होती. पण सत्तांतरानंतर वॉर्डांची संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.

त्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील वॉर्डांची संख्या ११५ राहिली आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग तयार करण्यात आल्यास महापालिकेच्या क्षेत्रात २९ प्रभाग होतील. त्यातील २८ प्रभाग चार वॉर्डांचे असतील तर एक प्रभाग तीन वॉर्डांचा असेल, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com