भारत जोडो यात्रेत अशी आहे राहुल गांधींची दिनचर्या

Bharat Jodo Yatra| भारत जोडो यात्रा पहाटेपासून सुरु होते पण त्याधीच राहुल गांधींच्या दिवसाची सुरुवात झालेली असते.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra : हिंगोली : भारत जोडो पदयात्रेने शुक्रवारी (ता.११ नोव्हेंबर) दुपारी नांदेडमधून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. आज यात्रेचा महाराष्ट्रात सहावा दिवस आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर जुन्या वेशीप्रमाणे मोठी स्वागत कमान उभारण्यात आली होती. तर फटाक्यांच्या आतषबाजीत राहुल यांचे स्वागत करण्यात आले. गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून ही भारत जोडो यात्रा अविरत सुरु आहे. लाखो लोक राहुल गांधींच्या या यात्रेत सहभागी झाले. पण तुम्हाला माहिती आहे का या यात्रेत त्यांचा दिनक्रम कसा आहे. भारत जोडो यात्रा पहाटेपासून सुरु होते पण त्याधीच राहुल गांधींच्या दिवसाची सुरुवात झालेली असते.

वाचा, अशी आहे राहुल गांधी यांची दिनचर्या

- सकाळी पाच वाजतापूर्वीच राहुल झोपेतून उठतात.

- हलका व्यायाम करतात. एखाद्या दिवशी क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर खेळ खेळतात

- चहा, नास्ता

- सहा वाजता त्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होते.

- त्यानंतर ज्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असतो त्याच परिसरातून सकाळच्या टप्प्यातील यात्रेला सहा वाजताच्या सुमारास सुरुवात

Rahul Gandhi
Narendra Modi : मोदी म्हणतात, 'मी थकत नाही कारण, रोज दोन-अडीच किलो शिव्या खातो.'

- राहुल यांच्या सोबत कन्याकुमारीपासून असलेले भारत यात्रीही चालायला लागतात.

- मध्ये स्थानिक कार्यकर्ते, नागरिक हेही जुळतात.

- एक-एक करता ही संख्या हजारो होते.

- रस्त्याच्या कडेला उभे असलेले किंवा ताफ्यात घुसू पाहणार्‍यांची तळमळ, भेटीची ओढ पाहून राहुल त्याला बोलावून घेतात किंवा अचानक त्याच्या जवळ जातात.

- आस्थेने चौकशी करतात, चालता-चालता विविध क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा करतात.

Rahul Gandhi
जामीन मिळताच आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया : ‘चाणक्य’ची नीती फसली...

- दहा- बारा किलोमीटर अंतर चालल्यानंतर यात्रा ठरलेल्या वेळी सकाळी नऊ ते 10 दहा वाजताच्या सुमारास दुपारच्या विश्रांतीसाठी थांबते.

- ज्यांनी राहुल यांच्या भेटीची वेळ घेतली अशा दोघा-तिघांना राहुल भेटतात.

- या ठिकाणी तंबू क्रमांक एक आणि दोन असतात. एकमध्ये राहुल आणि त्यांच्या सोबतचे 118 भारत यात्री आणि दोनमध्ये इतर भारत यात्री थांबतात.

- दुपारच्या जेवणाची व्यवस्था तंबूजवळच.

- तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही तंबुच्या प्रवेशद्वारावर

-दुपारचे जेवण झाल्यानंतर यात्रा चारनंतर चालायला लागते.

-10-12 किलोमीटर चालल्यानंतर कॉर्नर सभेच्या ठिकाणी यात्रा येते.

- कॉर्नर सभा झाल्यानंतर निवासाच्या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था

- राहुल यांचा ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था असते.

- ज्या कंटनरमध्ये राहुल आणि त्यांच्या सोबतचे 118 भारत यात्री आहेत त्या ठिकाणी वर्तुळाकारात कंटेनर लावले जातात.

-भोवती सुरक्षारक्षकांचे तंबू असतात.

- सकाळी कार्यकर्ते, राहुल स्वतःच साफसफाई करून निवास ठिकाण सोडतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in