निवडणुका आल्या की मराठी पाट्या, सीमावाद, अस्मिता कशी आठवते?

लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? (Aimim Mp Imtiaz Jalil)
Aimim, Mp Imtiaz Jalil
Aimim, Mp Imtiaz JalilSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील सर्व आस्थापनांवर मराठी अक्षरे ठळक दिसतील अशा पद्धतीने मराठी पाट्या लावण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. (Mp Imtaiz Jalil) आता यावर एमआयएमने (Aimim) सरकारवर हल्ला चढवत ` मराठी पाट्या लावा सांगणारे सरकार, मराठी तरुणांना नोकऱ्या देणार आहेत का`,? असा सवाल केला आहे. (Aurangabad)

एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयावर ट्विटच्या माध्यमातून तिखट प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना तुम्ही मुर्ख समजता का? निवडणुका आल्या की तुम्हाला मराठी अस्मिता, मराठी पाट्या असे विषय कसे सुचतात? असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

काल मंत्रीमंडळात मराठी पाट्यांसदर्भात निर्णय झाला आणि लेगच एमआयएमने यावर प्रतिक्रिया दिली. इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, `असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलता. लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का, हा एक मिलियन डॉलरचा प्रश्न आहे`.

Aimim, Mp Imtiaz Jalil
वर्षानुवर्षे दिमाखात मराठी पाट्या लावणाऱ्या दुकानदारांचा `मनसे`, सत्कार

या शिवाय तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का? किंवा अल्पसंख्याक आणि विशेषत: मुस्लिमांना त्या बदल्यात काहीही न मिळता फक्त मते द्यायची आहेत, असा चिमटा देखील इम्तियाज जलील यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला काढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in