Sudam Sonawane| तब्बल वीस वर्षांनी शिवसेनेच्या माजी महापौरांची घर वापसी

Sudam Sonawane| Shivsena| नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या सोनवणे यांनी देखील शिवसेना सोडली होती
Sudam Sonawane|
Sudam Sonawane|

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी महापौर सुदाम सोनवणे हे तब्बल वीस वर्षांनी पुन्हा स्वगृही परतणार आहेत. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्ष वाढीसाठी कष्ट घेतलेल्या शिवसैनिकांपैकी सुदाम सोनवणे हे ओळखले जातात. नारायण राणे यांनी शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या सोनवणे यांनी देखील शिवसेना सोडली होती. राणे यांच्यापाठोपाठ तेही काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झाले, मात्र राणेंप्रमाणेच सोनवणे यांनी देखील कालांतराने अनेक पक्षांमध्ये जात आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला होता.

शिवसेनेने त्यांना नगरसेवक महापौर अशी अनेक पदे दिली. राणे यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडल्यानंतर सोनवणे यांची राजकीय वाटचाल मात्र बिकट राहिली. राणे राज्यस्तरावरील नेते असल्यामुळे त्यांना सत्ता पद मिळत गेले, सोनवणे मात्र शिवसेना सोडल्यापासून अडगळीत पडले होते. काही काळ त्यांनी राजकारणापासून लांब राहत आपले मन व्यवसायामध्ये गुंतवून घेतले. मात्र राजकारण करण्याची हौस त्यांना शांत बसू देत नव्हती.

Sudam Sonawane|
Co-operative : थकबाकीदारांच्या नातेवाईकांच्या ठेवीतून कर्जवसुली

त्यामुळे तीन वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता. राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलला जाऊन सोनवणे व त्यांच्या मुलाने राज ठाकरेंची भेट घेऊन मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. औपचारिक प्रवेश घेतला असून टीव्ही सेंटरच्या मैदानात मोठी सभा घेऊन आपण मनसेत जाणार असल्याचे सोनवणे यांनी जाहीर केले होते.

मात्र मनसे आणि सोनवणे यांनी देखील नंतर पक्षप्रवेशाचा निर्णय फारसा मनावर घेतल्याचे दिसून आले नाही. कोरोनामुळे तीन वर्ष कुठल्याच राजकीय मोठ्या घडामोडी न घडल्याने सोनवणे यांचा प्रवेश तेव्हा टळला. त्यानंतर राज्यात शिवसेनेतच उभी फूट पडली. उद्धव सेनाविरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष सुरू झाल्यानंतर शिवसेनेत अडगळीत पडलेल्या अनेकांना अच्छे दिन आल्याचे चित्र दिसू लागले. आगामी महापालिका निवडणुका पाहता सुदाम सोनवणे यांना देखील ही घवापसीची संधी वाटू लागली. त्यासाठीच त्यांनी स्थानिक नेत्यांची संपर्क साधून पुन्हा शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली.

त्याला गेली अनेक वर्ष पक्षात कार्यरत असलेल्या निष्ठावान शिवसैनिकांनी कडाडून विरोध दर्शवला. सोनवणे यांना प्रवेश दिला तर आम्ही पक्षातून बाहेर जाऊ असे दबाव तंत्र ही वापरले. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षाला अधिक बळकटी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आणि काल दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्तच्या अभिवादन कार्यक्रमात माजी महापौर सुदाम सोनवणे हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या गोटात दिसले.त्यामुळे सोनवणे यांची घरवासी निश्चित समजली जाते. सिडको हडको या हिंदू बघून भागात सोनवणे यांचे वर्चस्व असल्यामुळे त्याचा फायदा शिवसेनेला येणाऱ्या महापालिका व 2024 च्या विधानसभा -लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in