Hingoli News: भाजपला दावा सांगू द्या, आम्हाला काही बोलायचे नाही असे आदेश आहेत..

Mp Hemant Patil : पाटील यांच्या या खुलाशामुळे शिंदे गट तुर्तास या विषयावरून वाद निर्माण करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते.
Mp Hemant Patil Reaction News, Hingoli
Mp Hemant Patil Reaction News, HingoliSarkarnama

Marathwada News : राज्यात भाजपने लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० जागांचे लक्ष्य घेवून तयारी सुरू केली आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघावर देखील (Bjp) भाजपने दावा सांगत तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपने मतदारसंघावर दावा केला असला तरी या विषयावर सध्या काहीच बोलू नका, असे आदेश खासदारांना देण्यात आले आहेत.

Mp Hemant Patil Reaction News, Hingoli
Aurangabad : सत्तारांच्या मैत्रीखातर विखे पाटलांची कृषी महोत्सवाला भेट..

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे १२ खासदार काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Hingoli) हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा हवाला देत या विषयावर अधिक बोलणे टाळले. राज्यातील सत्तांतरानंतर आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थासह विधानसभा, लोकसभा निवडणुका भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रित लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबादेत स्पष्ट केले.

तसेच कोणत्या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघात कोणी लढायचे हे देखील पंतप्रधान मोदी, अमित शहा, फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समन्वयाने ठरवतील असे सांगायला देखील ते विसरले नाहीत. परंतु भाजपची मराठवाड्यातील आठही मतदारसंघातील तयारी पाहता शिंदे गटात आणि विद्यमान खासदारांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे.

खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भाजपला औरंगाबाद, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद मतदारसंघात दावा करू द्या, पण सध्या या विषयावर काहीच बोलायचे नाही, अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याविषयावर मी अधिक बोलू शकत नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू. सध्या मी वडिलांच्या प्रकृतीमुळे मुंबईत आहे.

हेमंत पाटील यांच्या या खुलाशामुळे शिंदे गट तुर्तास या विषयावरून वाद निर्माण करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. लोकसभा मतदारसंघावरून वाद निर्माण करुन राज्यातील सत्तेवर त्याचा परिणाम होवू नये, अशी सावध भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपच्या तयारीने शिंदे गटाला मात्र चिंता सतावत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com