Hingoli : आमदार बांगर यांच्या फार्म हाऊसचे उद्धाटन रद्द, मुख्यमंत्री फक्त भेट देणार..

शिंदे गटाच्या बंडात बालाजी कल्याणकर हे सुरुवातीपासूनच होते, तर बांगर यांचे तळ्यात-मळ्यात विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी संपले. (Mla Santosh Bangar)
Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News
Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar NewsSarkarnama

हिंगोली : कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या सावरखेड येथील फार्म हाऊसचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार होते. या संदर्भात `सरकारनामा`ने वृत्त प्रकाशित करताच समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. (Hingoli) राज्यातील अनेक भागात पूर परिस्थिती, अतिवृष्टीमुळे शेतकरी, नागरिकांचे नुकसान झालेले आहे, अशा संकटात सामान्य नागरिकांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री समर्थक आमदारांच्या फार्म हाऊसचे उद्धाटन करत असल्याटी टीका मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री सचिवालयाकडून एकनाथ शिंदे यांचा जो हिंगोली दौरा जाहीर करण्यात आला होता, त्यामध्ये फार्म हाऊसच्या उद्धाटनाचा उल्लेख करण्यात आला होता. समाज माध्यमांमध्ये याचे संतप्त पडसाद उमटताच आता नव्याने दौरा जाहीर करण्यात आला असून त्यानूसार आता आमदार बांगर (Santosh Bangar) यांच्या फार्म हाऊसच्या उद्धाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त तिथे काही मिनिटांसाठी भेट देणार असल्याचे नव्या दौऱ्यात कळवण्यात आले आहे.हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. नांदेड मध्यचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या नांदेड-हिंगोली दौऱ्यावर आहेत.

शिंदे गटाच्या बंडात बालाजी कल्याणकर हे सुरुवातीपासूनच होते, तर बांगर यांचे तळ्यात-मळ्यात विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी संपले. त्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी दिल्लीत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला त्यात हिंगोलीचे खासदार हेमंतत पाटील देखील होते. या सर्व समर्थक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन बळ देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचा दौरा घोषित केला आहे.

Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News
Nanded : दोन्ही जिल्हाप्रमुख शिंदे गटात जाणार समजताच निघाले हकालपट्टीचे आदेश..

एकनाथ शिंदे आपल्या दौऱ्यात बांगर व पाटील यांच्यासाठी हिंगोलीत जाहीर सभा देखील घेणार आहेत. विशेष म्हणजे आमदार बांगर यांच्या सावरखेडा येथील फार्महाऊसचे उद्धाटन देखील मुख्यमंत्री करणार होते. परंतु या कार्यक्रमावरून टीका होताच आता दौऱ्यातून उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुधारित दौऱ्यानूसार मुख्यमंत्री आता फक्त या फार्म हाऊसला भेट देणार आहेत.

या शिवाय गेल्या ७ वर्षापासून आमदार बांगर यांच्याकडून कळमनुरी ते औढानागनाथ दरम्यान काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेत देखील मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. अग्रेसन चौक नांदेड नाका ते औंढानागनाथ मंदिरापर्यंत साधरणतः ३ ते ४ किलोमीटर मुख्यमंत्री पायी या कावड यात्रेत सहभागी होणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com