Hingoli Earthquake : लोक साखरझोपेत असतांना भुकंपाचे सौम्य धक्के...

Marathwada : जमीनीत होणाऱ्या सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे सांगितले. प्रशासनाने देखील त्याला दुजोरा दिला आहे.
Hingoli Earthquake News
Hingoli Earthquake NewsSarkarnama

Marathwada : हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातील ३५ ते ४० गावात रविवारी (ता.आठ) पहाटे साडेचार वाजता Hingoli Earthquake भुकंपाचे सौम्य धक्के बसले. त्याची ३.६ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. भितीमुळे घरातील नागरिक रस्त्यावर आले होते, मात्र यात कोणतीही जीवीतहानी अथवा नुकसान झालेले नाही. वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात अनेक वर्षांपासून जमिनीतून गुढ आवाज येतात. या आवाजाने शतक पुर्ण केले आहे.

Hingoli Earthquake News
Marathwada Teachers Constituency : अजित पवार मैदानात ; विक्रम काळे ११ रोजी अर्ज दाखल करणार..

यात वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आवाजाचे केंद्र मानले जाते. या गावात आवाज आल्यावर इतर गावातही असाच प्रकार घडत आहे. पूर्वी या गावात वर्ष सहा महिण्यात असे आवाज येत होते आता ते एक महिना ते पंधरा दिवसावर आले आहेत. (Hingoli) यापूर्वी तीन ते चार वेळा भुकंपाचे सौम्य धक्के देखील या गावांना बसले आहेत. (Marathwada) या संदर्भात स्वारातीम विद्यापीठाच्या भुगर्भ तज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी हे आवाज जमीनीत होणाऱ्या सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे सांगितले. प्रशासनाने देखील त्याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खांबाळा, सिरळी, खापरखेडा आदी गावांना भुकंपाचे धक्के जाणवले. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदारी, कंजारा, पुर, वसई, जलालदाभा, काकडदाभा आदी , कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, सिंदगी, बोल्डा, असोला, येहळेगाव आदी गावांत भुकंपाचा धक्का बसला आहे.भल्या पहाटे आलेल्या आवाजाने गावकरी दचकून जागे झाले व घराबाहेर पडले.

रविवारी आलेला आवाज मोठा असल्याचे पांगरा शिंदे येथील माधव शिंदे, भागवत शिंदे तसेच बोल्डा येथील गणेश खंडागळे, रमेश खंडागळे, पोतरा येथील पुरभाजी चेभेले, अंकुश मुलगीर, वैभव मुलगीर यांनी सांगितले. रविवारी पहाटे झालेल्या या भुकंपाची ३.६ रिश्टर स्केल एवढी नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे रोहित कंजे यांनी सांगितले. या भुकंपाने कुठेही नुकसान झालेले नाही नागरिकांनी घाबरून नये, नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com