Hingoli : काॅंग्रेसच्या पठडीत तयार झालेले टारफे बांगरांना टक्कर देऊ शकतील का?

बांगर यांच्याकडून झालेला पराभव आणि खासदार राजीव सातव यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर टारफे हे काॅंग्रेसमध्ये एकाकी पडल्याचे चित्र होते. (Hingoli Shivsena)
Hingoli Shivsena Political News
Hingoli Shivsena Political NewsSarkarnama

हिंगोली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात झालेल्या सत्तांतराने अनेक नवी राजकीय समीकरणं उदयाला येऊ लागली आहेत. (Shivsena) शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे इतर पक्षात अडगळीत पडलेल्या नेत्यांना देखील अच्छे दिन आले आहेत. तर शिवसेनेत ज्यांना वर्षानुवर्षे वेटिंगवर ठेवण्यात आले होते, त्यांना देखील आता पद आणइ सन्मान मिळू लागला आहे.

हिंगोली (Hingoli) जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण कळमनुरीचे (Santosh Bangar)आमदार व तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख यांनीच शिंदे बंडात सहभागी होत पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे शिवसेनेची जिल्ह्यात सुरू असलेली पडझड रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. काॅंग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे व अन्य पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.

संतोष बांगर यांना शह देण्यासाठी संतोष टारफे यांचा पर्याय किती यशस्वी ठरतो हे भविष्यात स्पष्ट होईल. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे जावई असलेले संतोष टारफे याची ओळख आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण आहे. हिंगोली जिल्ह्यात आदिवासी युवक कल्याण संघाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करण्यात टारफे यांना यश आलेले आहे.

काॅंग्रेसमध्ये दाखल होण्यापुर्वी टारफे यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाकडून कळमुरीत नशीब आजमावले होते. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. बसपात बस्तान बसत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम सुरू केले.

कळमनुरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे राजीव सातव यांनी जेव्हा लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा कळमनुरीतून काँग्रेसने टारफे यांना उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात टारफे यांनी शिवसेनेच्या गजानन घुगे यांचा पराभव करत विजय मिळवला. दुसऱ्यांदा आमदार होण्याचचे त्यांचे स्वप्न २०१९ मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भंग केले.

Hingoli Shivsena Political News
Osmanabad : जे कारखाने घेतले ते कर्ज काढून, त्याची परतफेड सुरु आहे..

बांगर यांच्याकडून पराभव आणि खासदार राजीव सातव यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर टारफे हे काॅंग्रेसमध्ये एकाकी पडल्याचे चित्र होते. सातव यांच्या निधनानंतर काॅंग्रेस नेते राहूल गांधी व कुटुंबाने सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना बळ दिले. राजीव सातव यांच्याशी चांगले संबंध असलेल्या टारफेंचे आणि प्रज्ञा सातव यांच्यात मात्र मतभेद होते. त्यामुळे नाराजीतूनच त्यांनी काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत आपली कैफियत मांडली होती.

पक्षाने देखील त्यांची नाराजी दूर करण्याचा शब्द दिला. पण टारफे यांचा बहुदा निर्णय झाला होता, म्हणूनच आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कळमनुरीतून शिंदे सेनेच्या बांगरांविरुद्ध आता उद्धव सेनेचे संतोष टारफे दोन हात करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. टारफे यांच्या पक्षप्रेवशामुळे शिवसेनेने बांगर यांची कोंडी केल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in