
हिंगोली : शहरातील बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या व्यवसायिकाशी झालेल्या वादातून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी संबंधिताच्या घरासमोरी स्कार्पिओ आणि डंपर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Hingoli) या प्रकरणी पोलिसांनी चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भाजप (Bjp) युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण याने शहरात जाळपोळ करत गोंधळ घातल्याने शहरात एकच खळबळ उडाली. हिंगोली शहरातील बिल्डिंग मटेरियल व्यावसायिक पंकज होडगिर यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला. (Crime News) चव्हाण याने चक्क होडगिर यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ व डंपरच पेटवून दिले.
या प्रकरणी पंकज होडगीर यांच्या तक्रारीवरून पप्पू चव्हाण याच्यासह इतर एका आरोपी विरोधात शहर पोलीस व ग्रामीण पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत पप्पू चव्हाण स्वतः गाडी पेटवतांना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचे आढळून आले.
दरम्यान, या जाळपोळीनंतर पप्पू चव्हाण याच्यासह त्याचे साथीदार फरार झाले आहेत. पोलिस या सगळ्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत. अचानक झालेल्या या जाळपोळीच्या घटनने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे सहायक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी सागंतिले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.