Hingoli : अशोक चव्हाण राज्यातील काॅंग्रेसचे एक नंबरचे नेते, ते पक्ष सोडूच शकत नाही...

दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका सभेत ज्या प्रमुख दहा वक्त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यात अशोक चव्हाण हे होते. (Hingoli Congress)
Congress Leader Ashok Chavan-Manikrao Thakeray News Hingoli
Congress Leader Ashok Chavan-Manikrao Thakeray News HingoliSarkarnama

हिंगोली : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. (Hingoli) यावर अशोक चव्हाण यांनी देखील स्पष्टीकरण दिले असले तरी रोज नव्या कुठल्या तरी भाजप नेत्याचा हवाला देवून चव्हाण काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार, अशा बातम्या येतात. या संदर्भात काॅंग्रेसचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हिंगोलीत (Ashok Chavan) अशोक चव्हाण हे काॅंग्रेस सोडून जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

भारत जोडो अभियाना संदर्भात बैठकीसाठी ते हिंगोलीत आले होते. यावेळी प्रसार माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांना छेडले. अशोक चव्हाण हे (Congress) काॅंग्रेसचे राज्यातील नंबर एकचे नेते आहेत, त्यामुळे ते काॅंग्रेस सोडूच शकत नाहीत, विरोधक त्यांच्याबद्दल अशा उलटसुलट बातम्या पसरवत आहेत,असा आरोप देखील ठाकरे यांनी केला.

केंद्रातील भाजपचे नेते व पुर्वाश्रमीचे काॅंग्रेसवासी ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हवाल्याने अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यापुर्वी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा दावा केला होता. मात्र अशोक चव्हाण यांनी लगोलग तो खोटा असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर काही दिवस त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. परंतु आता नव्याने दिल्लीचा हवाला देत त्यांच्या भाजप प्रेवशाची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात माणिकराव ठाकरे यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, अशोक चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. राज्यातील एक नंबरचे काॅंग्रेस नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Congress Leader Ashok Chavan-Manikrao Thakeray News Hingoli
Aurangabad : मंत्रीमंडळ बैठकीची चर्चा, पण मंत्रीच दुजोरा देईना..

दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका सभेत ज्या प्रमुख दहा वक्त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यात अशोक चव्हाण हे होते. त्यामुळे त्यांचे पक्षात आणि दिल्लीत देखील किती महत्व आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे अशोक चव्हाण हे कधीच काॅंग्रेस सोडू शकत नाहीत, असा मला विश्वास आहे. विरोधक हेतुपूरस्पर त्यांच्याविरोधात अशा खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप देखील ठाकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com