उच्च न्यायालयाचा दणका! राज ठाकरेंची सभा रद्द करण्याची मागणी करणाऱ्याला एक लाखाचा दंड

राज ठाकरेंची सभा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात घेतली होती धाव
उच्च न्यायालयाचा दणका! राज ठाकरेंची सभा रद्द करण्याची मागणी करणाऱ्याला एक लाखाचा दंड
MNS| Raj Thackeray| Sarkarnama

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिसांकडून अखेर परवानगी मिळाली आहे. या सभेमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ही सभा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका राजकीय हेतूनं प्रेरित असल्यानं न्यायालयानं याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

राज ठाकरेंची सभा रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली होती. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी पोलीस आयुक्तांनी दिलेला परवानगीचा आदेश न्यायालयासमोर सादर केला. या सभेसाठी पोलीस आयुक्तांनी सर्व खबरदारी घेतल्याची माहितीही सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. राजकीत हेतूनं प्रेरित होऊन ही याचिका दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

MNS| Raj Thackeray|
..तर राज ठाकरेंची सभाच बंद पाडणार! भीम आर्मीचा थेट इशारा

राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या सभेसाठी सुमारे अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. दरम्यान, परवानगी मिळाली नाही तरी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांनी देखील संघर्ष टाळत संयमाची भूमिका घेतली आहे. मनसे नेत्यांच्या आधी काल स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठकही पार पडली होती.

MNS| Raj Thackeray|
गणेश नाईकांना अडचणीत आणणाऱ्या दीपा चौहान राष्ट्रवादीच्या वाटेवर

राज ठाकरे यांची सभा 1 मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी होत आहे. 3 मे रोजी रमजान सण असल्याने या सभेतून कुठल्याही प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले जाऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. सभेला काही कडक अटी-शर्ती घालूनच परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी कुठलाही अनुचित प्रकार सभेदरम्यान किंवा त्यानंतर घडू नये, यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. या सभेच्या बंदोबस्तासाठी 8 पोलीस उपायुक्तांसह अन्य अधिकारी व दोन हजार पोलीस कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.