High Court News : `त्या` ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने राजीनामा दिला अन् घेतली न्यायालयात धाव..

Grampanchayat : सरपंच पदासाठी सर्वाधिक १४ लाख ५० हजार रूपयांची बोली लावण्यात आली.
High Court, Aurangabad News
High Court, Aurangabad NewsSarkarnama

Aurangabad : लाखो रुपयांची बोली लावत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीची संपुर्ण कार्यकारणीच जाहीर केल्यामुळे औरंगाबादच्या शेलुद ग्रामपंचायतीची (Grampanchayat) राज्यभरात चर्चा झाली होती. आता याच ग्रामपंचायतीतील उपसरपंचाला अचानक साक्षात्कार झाला आणि त्याने राजीनामा देत या संपुर्ण प्रक्रियेच्या विरोधात खंडपीठात धाव घेतली आहे.

High Court, Aurangabad News
Sanjana Jadhav News : दहा वर्ष घरात आमदारकी माझ्यामुळेच ; आता जनता माझ्या पाठीशी..

ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी गावच्या विकासासाठी वैयक्तीय रक्कम जमा करून ग्रामपंचायत बिनविरोध काढली. (Aurangabad) महिला सरपंचपदासाठी १४ लाख ५० हजार तर उपसरपंच पदासाठी चार लाख रूपये देण्यात आले. (High Court) एकूण २६ लाख ५६ हजार रक्कम जमा केल्यानंतर ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यात आली.

दोन महिन्यानंतर चार लाख रूपये दिलेल्या उपसरपंचास साक्षात्कार झाला. त्याची सदसदविवेकबुद्धी जागृत झाली. त्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. लोकशाहीची हत्या झाली म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांनी प्रकरणात राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली आहे.

औरंगाबाद तालुक्यातील शेलुद गावची ग्रामपंचायत बिनविरोध काढायची यासाठी ग्रामस्थ आणि इच्छुक उमेदवारांनी एक फॉर्मुला बनविला. पदानुसार रक्कम निश्चित करण्यात आली. सरपंच पदाला सर्वाधिक तर सदस्यपदास त्यापेक्षा कमी रक्कमेची बोली ठरली. जो सर्वात जास्त बोली लावेल त्याला सरपंच केले जाईल. नऊ सदस्य असलेल्या शेलूदच्या ग्रामपंचायत कार्यकारीणी निवडीसाठी बोली प्रक्रिया सुरू झाली.

सरपंच पदासाठी सर्वाधिक १४ लाख ५० हजार रूपयांची बोली लावण्यात आली. सरपंच पद हे महिला प्रवर्गासाठी राखीव होते. शकुंतला योगेश ससेमहाल यांनी सर्वाधिक बोली लावल्याने त्यांना सरपंच करण्यात आले. उपसरपंच पदासाठी राजू म्हस्के यांनी चार लाख रूपयांची बोली लावली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होणार म्हणून बोली लावण्याच्या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले.

High Court, Aurangabad News
Mungantiwar : बहुमत म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती नाही, 'त्यांच्या' दावणीला बांधलेल्यांचा पक्ष कसा होईल?

बोली पद्धतीने निवडूण पार पडल्याने सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडूण आले. उपसरपंच राजू म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे मार्फत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. आपल्या अंतरआत्म्याचा आवाज ऐकूण आपण उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.

ग्रामपंचायत निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाली. पैसे देऊन आणि बोली लावून पदाधिकारी निवडण्यात आले. त्याची चित्रफितही तयार करण्यात आली. अशा प्रकारे निवडलेली ग्रामपंचायत बरखास्त करून लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्याव्यात अशी विनंती त्यांनी खंडपीठाला केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com