High Court News : करूणा मुंडेंवर दाखल गुन्ह्यातील फिर्यादीसह पोलिसांना खंडपीठाची नोटीस..

Marathwada : गुन्हा व दोषारोप पत्र रद्द करण्यात यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता.
Bombay High Court Bench News
Bombay High Court Bench NewsSarkarnama

Karuna Munde : सप्टेंबर २०२१ मध्ये करुणा मुंडे-शर्मा यांनी फेसबुक लाईव्हवर माहिती देत परळीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. (Parli) परळी वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी जात असतांना त्यांना काही महिलांनी विरोध केला होता. यावेळी झालेल्या गोंधळानंतर करूणा शर्मा यांच्या विरोधात परळी पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्ह दाखल झाला होता.

Bombay High Court Bench News
Old Pension Protest News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपातही `पन्नास खोके, एकदम ओक्के` च्या घोषणा..

तर त्यांच्यासोबत असलेल्या मोरे या व्यक्तीच्या विरोधात चाकूने हल्ला केल्याची तक्रार आणइ त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. (Karuna Munde) हे गुन्हे खोटे आणि राजकीय सूडबुद्धीतून दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र व खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी करूणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad High Court) याचिका दाखल केली होती.

या प्रकरणाची सुनावणी झाली असता न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमुर्ती एम. एम. साठे यांनी परळी पोलिस तसेच फिर्यादीस नोटीस बजावली आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी करूणा मुंडे-शर्मा या पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत गेल्या होत्या. तत्तपुर्वी परळी वैजनाथ मंदिर परिसरात त्यांना महिलांनी विरोध दर्शवत धक्काबुक्की केली होती.

यावेळी झालेल्या गोंधळानंतर काही महिलांनी परळी पोलिस स्टेशनमध्ये जावून करूणा मुंडे व त्यांच्यासोबत असलेले मोरे यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली होती. मोरे याने आपल्यावर चाकून हल्ला केल्याचे देखील फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले होते. यावरून पोलिसांनी करुणा शर्मा व मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सदरचा गुन्हा हा जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे तसेच मारहाण, धमकी देणे बाबत करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच त्या दिवशी करून शर्मा व मोरे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी या दोघांनाही जामीन मंजुर झाला. सदरच्या गुन्ह्यामध्ये इतर साक्षीदारांचे जबाब हे हे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर नोंदवले गेले. त्यानंतर करुणा शर्मा उर्फ करुणा मुंडे व इतर आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रही दाखल झाले होते. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर करुणा अशोक शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांनी सदरील गुन्हा हा राजकीय हेतूने दाखल केलेले आहे.

Bombay High Court Bench News
Ambadas Danve News : शिंदे गटाला विधानसभेला ४८ जागा ? अरेरे मिंधे गॅंगची हीच किंमत का ?

तसेच सदरचा गुन्हा खोटा असल्याने सदरील दोषारोप पत्र व गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमुर्ती एम. एम. साठे यांच्यासमोर झाली असता सर्व कागदपत्राचे पडताळणी केल्यानंतर तसेच गुन्ह्यातील व दोषारोप पत्रामधील सर्व साक्षीदारांचे जबाब पाहिल्यानंतर परळी पोलीस स्टेशन तसेच फिर्यादी यांना नोटीस बजावली. करुणा अशोक शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांच्या बाजूने ॲड. खोले पाटील व ॲड. संदीप आंधळे यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com