आनंदराव अडसुळांना न्यायालयाचा दणका; अडचणीत आणखी वाढ

सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाने दणका दिला आहे.
आनंदराव अडसुळांना न्यायालयाचा दणका; अडचणीत आणखी वाढ
Anandrao Adsulsarkarnama

मुंबई : सिटी सहकारी बँक (City Co-Operative Bank) गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने (High Court) आज फेटाळून लावली. जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

अडसूळ हे सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना खातेधारकांचे पैसे बेकायदा पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यात सुमारे 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, अशी तक्रार आमदार रवी राणा यांनी केली आहे. त्यानंतर सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीला बोलावले होते. प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे सांगत अडसूळ यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता.

Anandrao Adsul
पंजाब पुन्हा तापलं; मुख्यमंत्री चन्नींनी घेतली थेट कॅप्टनच्या घरी धाव

ईडीने अडसूळ यांच्या कार्यालयावरही छापे टाकले आहेत. ईडीने दाखल केलेला प्राथमिक तपास अहवाल (ईसीआयआर) रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी अडसूळ यांनी उच्च न्यायालयात केली होती. न्यायाधीश नितीन जामदार आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे आज यावर सुनावणी झाली. अडसूळ यांचा या गैरव्यवहारात कोणताही संबंध नाही. केवळ राणा यांच्या विरोधात निवडणूक याचिका केली म्हणून राजकीय हेतूने हा आरोप करण्यात आले आहे, असा युक्तिवाद अडसूळ यांचे वकील अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी केला. खंडपीठाने हा युक्तिवाद अमान्य करीत अडसुळांची याचिका नामंजूर केली.

Anandrao Adsul
मोठी बातमी : देशातील कोळसा टंचाईची खुद्द केंद्रीय कोळसा मंत्र्यांनीच दिली कबुली

ईडीने चौकशी सुरू केल्यानंतर तब्येत चांगली असतानाही अडसूळ प्रकृतीची सबब पुढे करत वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. त्यामुळे तपास कसा करणार, असा सवाल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. अडसूळ हे सध्या एसआयव्ही रुग्णालयात दाखल आहेत. यापूर्वी त्यांच्यावर गोरेगाव येथील लाईफलाईन केअर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Related Stories

No stories found.