High Court : माजी आमदार अनुसया खेडकरांसह इतर आरोपींना जामीन मंजूर.

Marathwada : २००८ मध्ये हे आंदोलन झाले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्य जवळपास दीडशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
Bombay High Court, Bench Aurangabad
Bombay High Court, Bench AurangabadSarkarnama

Nanded : नांदेड मधील हिंगोली गेट येथे महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या सरकारी मालमत्तेच्या नुकसानीस दोषी धरुन (Nanded District Court) नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन शिवसेना आमदार अनुसया खेडकर आणि इतर शिवसैनिकांना पाच वर्ष सक्तमजुरी ठोठावली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करण्यात आले असून न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी खेडकर व इतर आंदोलकांचा जामीन मंजूर केला.

Bombay High Court, Bench Aurangabad
High Court News : ऐन निवडणुकीत भाजपला दणका, माजी सभापतीच्या भ्रष्टाचाराची खंडपीठाकडून दखल..

सन २००८ मध्ये हे आंदोलन झाले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्य जवळपास दीडशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (Aurangabad High Court) एसटी चालकाच्या फिर्यादीवरुन एसटी बसेस, मनपा वाहन व पोलिस वाहनांचे नुकसान केले आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा गुन्हा दाखल करण्यात आला. (Nanded) १९ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.

सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने अनुसया प्रकाश खेडकर, महेश प्रकाश खेडकर, सुभाष शिंदे, मनोज आहिर उर्फ यादव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ११ एप्रिल २०२३ रोजी भादंवि कलम ३५३, ३३२, ३३६, ४२७, ३४१, १४३, १४७, १४८ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम १९८४च्या कलम ३ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख बासष्ट हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. (Marathwada)

या निर्णयास अनुसया खेडकर आणि इतरांनी खंडपीठात आव्हान दिले. खेडकर यांच्यातर्फे ॲड. शैलेंद्र एस. गंगाखेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्रकरणात सत्र न्यायालयाने शिक्षेच्या आदेशाची संपूर्ण प्रत आरोपींना ६ दिवस उलटुनसुध्दा उपलब्ध न करुन दिलेली नाही.

ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या विरोधात असून यामुळे आरोपीच्या मौलिक अधिकाराची पायमल्ली करणारी आहे. युक्तीवादानंतर खंडपीठाने आपल्या आदेशात यासंदर्भातील निरीक्षणे नोंदवत सर्व आरोपींचे जामीन मंजूर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com