Beed : सोनवणेंनी ठासून सांगितले राष्ट्रवादीतच राहणार अन् लोकसभाही लढविणार

यापुर्वी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुका लढलेल्या सर्वच उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आपण हा इतिहास बदलणारे आहोत. आपण राष्ट्रवादीतच राहू. (Ncp Beed)
Bajarang Sonawane, Ncp Beed
Bajarang Sonawane, Ncp BeedSarkarnama

बीड : राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाने पाच वेळा लोकसभेच्या निवडणुका लढविल्या. यात एकदा पक्षाला यश आले. (Beed) मात्र, आपला पराभव झाला असला तरी आतापर्यंतच्या सर्व उमेदवारांपेक्षा अधिक मते आपल्याला पडली. (Ncp) आपली छाती फाडली तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडेच दिसतील. (Dhnanajay Munde) त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार व आगामी लोकसभा निवडणुकही आपण लढविणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ता. २५ रोजी सोनवणेंच्या जागी राजेश्वर चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर सोनवणे समर्थकांनी सोशल मिडीयावरुन नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी सोनवणे यांनी समर्थकांसह पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

आपण विध्वसंक असलो तरी धरसोड करणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार असे निक्षुण सांगणाऱ्या सोनवणे यांनी रेशन, वाळूठेक्यांसाठी प्रयत्न केले नाहीत, विधान परिषदेला भाजपमधून आयात उमेदवार कोणी आणला, बिनविरोध भाजपला जागा द्यायची होती का, हे आपल्याला कळले नाही, बाहेरुन आलेल्यांना आमदारकी दिली, अशा कोरपखळ्या आणि टोले नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार संजय दौंड व नुतन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना लगावले.

सोनवणे म्हणाले, मुलीच्या पराभवाचे शल्य आहे, मी राष्ट्रवादी सोबतच राहणार. एकदाचा कार्यमुक्त झालो याचा आनंद झालाय. अध्यक्ष म्हणून काम करताना बंधने, जबाबदाऱ्या होत्या, सर्वांची मर्जी सांभाळत काम करण्याची कसरत करावी लागे. पक्षाने संधी दिली होती याबद्दल आभार असे सांगतानाच विद्यमान अध्यक्षाला पक्षाच्या संहितेप्रमाणे दोन महिण्याचाच कार्यकाळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणूकीतील पराभवाचा संघटनेवर परिणाम होऊ दिला नाही. १९९२ पासून राजकारण करताना पराजयांपेक्षा विजय अधिक झाले. सामान्य लोकच आपली ताकद आहेत. मागच्या जिल्हापरिषद निवडणूकित बहुमत असतानाही सत्ता आली नव्हती, मी न्यायालयीन लढाई लढलो आणि जिल्हापरिषद राष्ट्रवादीकडे आणली. प्रत्येकवेळी मी झटून काम केले. २०१४ ला आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा शब्द दिला होता. पण, अजित पवारांच्या शब्दावर माघार घेतली.

मी पद कायम गौन माणले. पण तरिही काही लोक माझं पद काढण्यासाठी जातात याच शल्य आहे. पक्ष अडचणित असताना, मोठमोठे लोक सोडतं असताना, मी संघटनेत काम केले. सुरेश धस सोडून गेल्यानंतर १३ लोकांची बैठक घेतली. आपल्या बांधणीमुळेच आष्टीची जागा निवडून आली. माझ्याकडे नेत्यांच्या मागे पुढे करण्याची व नेत्यांसोबत फोटो काढण्याची सवय व हौस नसल्याचा टोलाही बजरंग सोनवणे यांनी लगावला.

केवळ पवारांच्या विचारांवर काम केलं असून भविष्यातही करणार केवळ पवारांच्या विचारांवर काम करणार. पण पक्षातील अनेकजण संधीसाधूपणा करतात, ज्या गावांत राष्ट्रवादीला मताधिक्क्य तिथे शुन्य रुपयांचा निधी व तिथे भाजपला मताधिक्य तिथे दहा लाखांचा निधी दिला जातो, असेही बजरंग सोनवणे म्हणाले. आपण वैयक्तीक चारित्र्य जपले, पैशाचा लोभ ठेवला नाही. पवारांच्या आदेशाने अनेक आंदोलने, मेळावे यशस्वी केले.

पक्षाने काही बेरीज - वजाबाकी करुन निर्णय घेतले असले तरी पक्षानेही आपल्याला संधी दिली व पक्षासाठी आपणही काम केले. त्यामुळे चर्चा काहीही होत असल्या तरी अजित पवार, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादीत आणि अजित पवारांसोबतच असल्याचे त्यांनी निक्षुण सांगीतले.

Bajarang Sonawane, Ncp Beed
Latur : नानाभाऊ राज्याचं सोडा, लातूरात स्वबळावर लढून दाखवा..

यापुर्वी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुका लढलेल्या सर्वच उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आपण हा इतिहास बदलणारे आहोत. आपण राष्ट्रवादीतच राहू, आगामी लोकसभेचे उमेदवारही आपणच असू असे सांगूनच आपला मतदार संघ राखीव असला तरी दुसऱ्या मतदार संघातूनही विधानसभेची निवडणुकही लढवू शकतो अशी वाट त्यांनी काढून दिली. जिल्ह्यात ऊसाचा प्रश्न गंभिर आहे, ऊसाचे गाळप होईल का नाही हा प्रश्न आहे. मी त्याचं नियोजन करतोय. आम्ही सभासदांचा ऊस शिल्लक राहु देणार नाही असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com