पाशा पटेल यांच्यावर दुःखाचा डोंगर; मुलाचे अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

ॲड. हसन पटेल हे मागील काही दिवसांपासून आजारही होते. त्यांच्यावर लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
Hasan Patel
Hasan PatelSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल (Pasha Patel) यांच्या मुलाचे आज (ता. २६ ऑगस्ट) पहाटे चार सुमारास उपचारादरम्यान लातूरमध्ये निधन झाले. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षीच हसन पटेल यांचा मृत्यू झाल्यामुळे पटेल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Hasan Patel passed away)

Hasan Patel
नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून केले पाचर्णे कुटुंबीयांचे सांत्वन; ‘जनतेसाठी उठणारा आवाज हरपला’

ॲड. हसन पटेल यांना मागील काही दिवसांपासून ह्‌दयाच्या विकाराचा त्रास होत होता. त्यांच्यावर लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी (ता. २५ ऑगस्ट) रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावल्याने आज पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. हसन पटेल यांचे कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पाशा पटेल यांचे मूळगाव असलेल्या औसा तालुक्यातील लोदगा येथे आज दुपारी दोनच्या सुमारास हसन पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडिल आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Hasan Patel
शिंदेसाहेब, तुम्ही गुवाहाटीला गेला, त्यावेळी मी पहिले समर्थन केले; आता आमचा आवाज का दाबता?

ॲड हसन पटेल हे मुंबई हायकोर्टात मागील काही वर्षांपासून वकिली करत होते. कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान पटेल हे लातूरमध्ये आले होते. प्रकृती अस्वस्थतेमुळं त्यानंतरच्या काळात ते लातूरमध्येच होते. त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर संपली. ॲड. हसन पटेल यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in