Harshvardhan Jadhav : शिवाजी महाराजांची बदनामी रोखण्यासाठी शेत विकून स्वाभीमान यात्रा काढणार..

Aurangabad Political : सत्ताधारी आणि विरोधक देखील मुग गिळून बसले आहेत. ईडी, सीबीआयच्या भितीमुळे ते बोलत नाहीत.
Ex. Mla Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Ex. Mla Harshvardhan Jadhav News, AurangabadSarkarnama

Aurangabad : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशातील महापुरूषांबद्दल भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधान आणि बदनामीच्या विरोधात स्वाभीमान यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. Marathwada यासाठी आपण स्वतःचे एक एकर शेत विकले असून येत्या १२ तारखेपासून काढण्यात येणाऱ्या स्वाभीमान यात्रेतून छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे आपण सांगणार आहोत.

Ex. Mla Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Gram panchayat election : बोगस मतदानाच्या आरोपावरून हाणामारी, दोघे जखमी..

या यात्रेत सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. (Aurangababd) भाजपचे नेते हे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या विरोधात सातत्याने बदनामीकारक बोलत आहेत, ते चुकून नाही तर ठरवून, एका षडयंत्राचा तो भाग असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

जाधव म्हणाले, कोणी म्हणतो महाराजांनी माफी मागितली, कोणी म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली. हे सगळ सुरू असतांना आपण मात्र गप्प बसलेलो आहोत. यावर कोणी काही बोलायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधक देखील मुग गिळून बसले आहेत. ईडी, सीबीआयच्या भितीमुळे ते बोलत नाहीत. पण मला ईडी, सीबीआयची भिती नाही, कारण मी या राजकीय नेत्यांसारखी संपत्ती कमावून ठेवलेली नाही.

त्यामुळे महापुरूषांबद्दल टीक करणाऱ्यांना सडेतोड उत्तर आणि शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे सांगण्यासाठी आपण स्वाभीमान यात्रा काढणार आहोत. त्यासाठी संपत्ती विकावी लागली तरी मागे हटणार नाही आणि म्हणून मी शिवाजी महाराजांसाठी एक एकर शेती विकली आहे. स्वाभीमान यात्रेच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे काम करणार आहे. आपण देखील यात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील जाधव यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com