Harshvardhan Jadhav News : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी जनहित याचिका दाखल..

Farmers : पैसेवारी ४८ असतांना ६० टक्के क्षेत्र बाधित आणि ४० टक्के नाही असे कसे होवू शकते.
Ex. Mla Harshvardhan Jadhav
Ex. Mla Harshvardhan JadhavSarkarnama

Marathwada : कन्नड तालुक्यातील पैसेवारी ४८ असतांना फक्त ६० टक्के क्षेत्रच नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवल्याचा आरोप करत जनहित याचिका दाखल केली असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी म्हटले आहे.

Ex. Mla Harshvardhan Jadhav
Abdul Sattar News : कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यात सातवी तर मतदारसंघात चौथ्या शेतकऱ्याची आत्महत्या..

विविध जीआर आणि नियमांवर बोट ठेवत हर्षवर्धन जाधव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना (Farmers) गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला. (Kannad) परंतु तालुक्यातील आणेवारी ४८ असतांना बाधित क्षेत्र म्हणून ६० टक्के क्षेत्राचीच नोंद करण्यात आली आहे.

तसा अहवाल देखील शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी मदतीपासून तालुक्यातील ४० टक्के शेतकरी हे वंचित राहतील. पैसेवारी ४८ असतांना ६० टक्के क्षेत्र बाधित आणि ४० टक्के नाही असे कसे होवू शकते, असा सवाल हर्षवर्धन यांनी उपस्थितीत केला आहे.

सरसकट तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतांना फक्त ६० टक्के क्षेत्रच बाधित झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नुकसान होवून देखील चाळीस टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहतील.

हा त्यांच्यावर अन्याय असून सरकारने हा चुकीचा अहवाल न स्वीकारता सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे नियमानूसार बंधनकारक आहे. परंतु चुकीच्या अहवालाचा आधार घेत ४० टक्के शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com