Harshvardhan Jadhav News : शिंदे-ठाकरेंशी काही देणेघेणे नाही, माझा आत्मा बाळासाहेबांसाठी तुटतोय..

Shivsena : बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी रक्ताचे पाणी केले हा वटवृक्ष उभा केला.
Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Harshvardhan Jadhav News, AurangabadSarkarnama

Aurangabad : बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेली शिवसेना आणि त्या पक्षाचे धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्याबद्दल माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी काल सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. शिवसेना पक्षाला सध्या ग्रहण लागले आहे, या काळात सगळ्यांनी आपल्याला जपत उद्याच्या सुर्योदयाची वाट बघावी, असा सल्ला देत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Mp Sanjay Jadhav News : नाव, चिन्ह मिळवले, जनाधाराचे काय ? मी शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत..

त्यानंतर जाधव यांना अनेकांनी फोन करून तुम्ही या भानगडीत पडू नका, असा दिला. त्यानंतर जाधव यांनी पुन्हा एक व्हिडिओ जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली. (Balasaheb Thackeray) जाधव म्हणाले, माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मला अनेकांचे फोन आले, मी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंशी जवळीक साधतोय असेही बोलले जावू लागले.

पण मला ना उद्धव ठाकरेंशी काही देणेघेणे आहे, ना एकनाथ शिंदेशी. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी रक्ताचे पाणी केले हा वटवृक्ष उभा केला. त्याच्याच सावलीतून आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांना दूर केले जात आहे, याचे दुःख म्हणून मी व्हिडिओ केला होता. बाळासाहेबांसाठी माझा आत्मा तुटतोय. बाकीच्यांशी मला काही देणेघेणे नाही असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर जाधव यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत आपले मत मांडले होते. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना देणे हे एक मोठे षडयंत्र आहे, ते ठाकरेंच्या शिवसैनिकांनी वेळीच ओळखलं पाहिजे. रात्र वैऱ्याची आहे, पक्षाला सध्या ग्रहण लागले आहे, अशावेळी सावध पावले उचलण्याची गरज आहे.

ग्रहणानंतर पुन्हा सुर्योदय होईल, त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागावे. ज्यांनी पक्षाचे चिन्ह आणि नाव पळवले त्यांना नीट करण्याची संधी येणारच आहे, तेव्हा तयारीला लागा. मी काही शिवसैनिक नाही, पण बाळासाहेब ठाकरेंचा चाहता आहे, त्यामुळे निवडणूक आयागोच्या निर्णयाचे मलाही दुःख झाले, असेही जाधव यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com