
Aurangabad : कन्नडमध्ये मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर तालुक्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडायला लागल्या आहेत. संजना जाधव (Sanjana jadhav) यांच्या मोर्चामुळे शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा मिळेल की नाही ? हे सांगता येत नसले तरी या मोर्चाने विरोधकांना मात्र कामाला लावले आहे.
संजना जाधव या येणारी विधानसभा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) हे देखील त्यांच्यासमोर उभे ठाकण्यास सज्ज झाले आहेत. ज्या पिशोर नाक्यापासून संजना यांनी मोर्चा काढला, त्याच नाक्यावर हर्षवर्धन हे जनतेचे कार्यालय म्हणजेच संपर्क कार्यालय सुरू करत आहेत. (Kannad) या कार्यालयाच्या उद्घाटनाला सामान्य नागरिकांनी यावे, असे आवाहन जाधव आणि त्यांच्या मैत्रीण इशा झा यांनी एकत्रिपणे केले आहे.
काही महिन्यांपुर्वी हर्षवर्धन यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आणि पोलिसात तक्रार देवून निघून गेल्या इशा झा कन्नडमध्ये परतल्या आहेत. हर्षवर्धन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा त्यांनी निर्धार केल्याचे बोलले जाते. संजना यांच्या मोर्चापुर्वी देखील झा यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता जनेतेच्या कार्यालय उद्घाटनानिमित्त त्या देखील सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे.
संजना यांच्या मोर्चावर टीका करतांना हर्षवर्धन यांनी मोर्चातून साध्य काय झाले ? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच ज्या शर्यतीतून तुम्ही मला बाहेर फेकू पाहात आहात, त्या रेसचा मी सिंकदर असल्याचा दावा देखील हर्षवर्धन यांनी केला होता. त्यानंतर आता संपर्क कार्यालय सुरू करत हर्षवर्धन यांनी देखील विरोधकांविरुद्ध दंड थोपटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कन्नड-सोयगांव मतदारसंघात मोठा राजकीय संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.