Harshvardhan Jadhav News : थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश...

Marathwada : छत्रपीत संभाजीनगरात के. चंद्रशेखर राव यांची सभा घेवून जाधव आपल्या समर्थकांसह बीआरएसमध्ये अधिकृत प्रवेश करणार.
Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News
Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS NewsSarkarnama

Marathwada News : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) यांनी हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षातच प्रवेश केला. जाधव यांनी स्वतः या संदर्भात व्हिडिओ जारी करत माहिती दिली. केसीआर यांच्या नेतृत्वाखाली तेंलगणा सारखे छोटे राज्य शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहे, तेच महाराष्ट्रातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी करायचे म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News
Vidhan Parisad News : गुलाबराव अडीच तास सभागृहात, पण खडसे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचेच उत्तर हवे..

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाला आणि एमआयएमच्या विजयाला ज्यांना जबाबदार धरले जाते ते माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan jadhav) यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय कार्यपद्धतीला साजेसा असा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. (Marathwada) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या भारत राष्ट्रीय समिती या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला.

विशेषतः शेती विषयावर काम करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी त्यांनी आपल्या पक्षात पायघड्या अंथरल्या आहेत. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना देखील त्यांनी महाराष्ट्रातील जबाबादारी देण्याची तयारी दाखवली होती, पण शेट्टी यांनी त्यांची आॅफर नाकारली. त्यानंतर राष्ट्रवादीचे शेती विषयात ज्ञान असलेले माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे आणि त्यांच्या पुत्राने केसीआर यांची भेट घेत सोबत काम करण्याची तयारी दर्शवली.

नुकताच त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत येत्या २६ मार्च रोजी लोहा येथे केसीआर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत बीआरएसमध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे. माजलांगवचे भाजप आमदार प्रकाश सोळुंके यांनी देखील केसीआर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी थेट हैदराबाद गाठत बीआरएसमध्ये प्रवेश केला. केसीआर यांनी स्वतः जाधव यांच्या गळ्यात गुलाबी रुमाल घालत त्यांचे पक्षात स्वागत केले.

लवकरच छत्रपीत संभाजीनगरात के. चंद्रशेखर राव यांची सभा घेवून जाधव आपल्या समर्थकांसह बीआरएसमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. आपण बीआरएसमध्ये प्रवेश का केला? याबद्दल भरभरून बोलतांना जाधव यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तेलंगणासारखे छोटे राज्य महाराष्ट्राच्या बरोबरीने काम करत आहे. शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज, प्रत्येक हंगामातील पेरणीसाठी बियाणे खरेदीसाठी पाच हजार रुपये आणि शेतात पिकवलेले धान्य हमीभावा प्रमाणे खरेदी या गोष्टीमुळे आपण प्रभावित झालो आहोत.

Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News
Devendra Fadanvis News : लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा राज्याच्या विचाराधीन..

तेलंगणा राज्यात हे शक्य आहे, तर महाराष्ट्रात का शक्य नाही? इथल्या शेतकऱ्यांना देखील या गोष्टी मिळाल्या पाहिजे, यासाठीच आपण बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या समर्थकांना देखील माझे आव्हान आहे, त्यांनी देखील केसीआर यांच्या पक्षात प्रवेश करून शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी पदरात पाडून घ्यावी. जाधव यांच्या या नव्या राजकीय निर्णयाचे जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होतात हे लवकरच दिसेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com