Harshvardhan Jadhav News : बीआरएसच्या सभेनंतर प्रस्थापित हादरलेत, मला धमक्या येतायेत..

Marathwada : हा का एवढ्या उचपाती करतो? याला ठोकला पाहिजे अशा प्रकारची तयारी सुरू झाली आहे.
Ex. Mla Harshvardhan Jadhav News
Ex. Mla Harshvardhan Jadhav NewsSarkarnama

BRS Maharashtra : बीआरएसचे सर्वेसर्वा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekahar Rao) यांची २४ एप्रिल रोजी झालेली सभा, त्यात झालेली भाषणं आणि गर्दी पाहून विरोधक हादरले आहेत. सामान्य माणूस एक लाखांची गर्दी जमवू शकतो हे लक्षात आल्यानंतर आता प्रस्थापितांनी तलवारी, खंजीर खुपसण्यासाठी त्याला धार लावून ठेवायला सुरूवात केली आहे. पण आपण सावधतेने शेतकऱ्यांसाठी काम करतचं राहायचं, असे आवाहन आणि इशारा बीआरएसचे मराठवाड्यातील नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

Ex. Mla Harshvardhan Jadhav News
Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : भुमरे, शिरसाटांना दिल्लीचे वेध का ? लोकसभा लढवण्यासाठी दोघेही तयार..

सोशल मिडियावर व्हिडिओ जारी करत त्यांनी आपल्याला धमक्या येवू लागल्या आहेत, असेही सांगितले. नांदेड मार्गे महाराष्ट्रात आणि मराठवाड्याची (Marathwada) राजधानी छत्रपती संभाजीनगरात बीआरएसने दणक्यात एन्ट्री केली. (K.Chandrashekhar Rao) तीनशेहून अधिक जणांचे प्रवेश, सभेला गर्दी, केसीआर यांचे सर्वसामन्यांना विचार करायाला लावणारे शांत आणि संयमी भाषण यामुळे या पक्षाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

रोज कुठल्या न कुठल्या पक्षातील नेता, पदाधिकारी, माजी, आमदार, खासदार बीआरएसमध्ये प्रवेश करत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी कार्यकर्त्यांना सावधानतेच्या इशारा दिला आहे. जाधव यांनी म्हटले आहे की, बीआरएस पक्षाकडे सर्वच पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांचा ओढा वाढत चालला आहे.

शहरातील सभेनंतर जो प्रतिसाद सामान्य नागरीक आणि शेतकऱ्यांकडून मिळतो आहे, तो पाहून प्रस्थापितांच्या पाचावर धारण बसली आहे. मी तर त्यांच्या डोळ्यावरच आहे, हा का एवढ्या उचपाती करतो? याला ठोकला पाहिजे अशा प्रकारची तयारी सुरू झाली आहे. तशा धमक्या देखील येवू लागल्या आहेत. पण आपण न घाबरता सावधानतेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटलं पाहिजे. त्यामुळे `हिंमत ए मर्दा, तो मदत ए खुदा`, या नूसार बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन देखील हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com