Harshvardhan Jadhav : मी मंदिराला दिलेला निधी परत द्या..

सभा मंडपाच्या उभाराणीसाठी मी निधी दिला होता. तीन वर्ष उलटून गेली तरी हा निधी खर्च झाला नाही, सभा मंडपही नाही, मग माझा निधी परत करा. (Harshvardhan Jadahv)
Ex. Mla Harshvardhan Jadhav
Ex. Mla Harshvardhan JadhavSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहरातील एका मंदिराच्या सभामंडपासाठी दिलेला निधी परत मागितला आहे. (Harshvardhan jadhav) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांची सिडको भागात एक काॅर्नर सभा झाली होती. यावेळी त्यांनी येथील हनुमान मंदिराच्या सभा मंडपासाठी १२ लाख रुपयांचा निधी दिला होता.(Aurangabad) मात्र तेव्हा दिलेला निधी मंदिर विश्वस्त मंडळाने अजूनही खर्च केलेला नाही, त्यामुळे संतापलेल्या जाधव यांनी हा निधी परत द्या, अशी मागणी केली आहे. (Marathwada)

हर्षवर्धन जाधव यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लक्षवेधी मते घेतली, याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला आणि त्यांच्या पराभव झाला. दरम्यान, जाधव यांनी जोरदार प्रचार करत शहरात काॅर्नर सभा, रॅली काढत हवा निर्माण केली होती. सिडको भागात झालेल्या अशाच एका भागात जाधव यांनी हनुमान मंदिराच्या सभामंडपासाठी १२ लाखांचा आमदार निधी दिली होता. परंतु लोकसभा निवडणुकीत जाधव यांचा पराभव झाला, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे निवडून आले.

दरम्यान, देशात कोरोनाची लाट आली आणि दोन-अडीच वर्ष सगळेच ठप्प झाले. आता जाधव यांना आपण दिलेल्या १२ लाखांच्या निधीची अचानक आठवण झाली आणि त्यांनी थेट मंदिर विश्वसत मंडळाकडे पाठपुरावा सुरू केला. तेव्हा आपण दिलेला निधी अजूनही खर्च करण्यात आलेला नाही, असे जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ मंदिर विश्वस्त मंडळाकडे हा निधी परत देण्याची मागणी केली.

Ex. Mla Harshvardhan Jadhav
Latur : अजारी कारखाने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय रद्द करा, अन्यथा कोर्टात जाणार...

सभा मंडपाच्या उभाराणीसाठी मी निधी दिला होता. तीन वर्ष उलटून गेली तरी हा निधी खर्च झाला नाही, सभा मंडपही नाही, मग माझा निधी परत करा, असे जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोरोनामुळे संपुर्ण कामकाज बंद होते, त्यामुळे सभा मंडपाचे कामकाज करता आले नाही, आता या सभा मंडपाचा खर्च देखील पाचपट वाढला असून तो ६० लाखांवर गेल्याचा दावा देखील विश्वस्त मंडळाने केला आहे. लवकरच काम सुरू करू, असे देखील मंदिराकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com