Harshvardhan Jadhav News : पुन्हा माझ्या दारात येवू नका, हर्षवर्धन यांची आगपाखड..

Kannad : ज्यांच्या हातात निर्णय घेवून मदत देण्याचा अधिकार आहे, ते न करता मोर्चे कसले काढता?
Ex. Mla Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Ex. Mla Harshvardhan Jadhav News, AurangabadSarkarnama

Aurangabad : संजना जाधव यांनी काल कन्नडमध्ये शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढला. या मोर्चा गर्दी देखील चांगली झाली होती. यावरून आता हर्षवर्धन विरुद्ध संजना (Sanjana Jadhav) असा संघर्ष सुरू झाला आहे. कालच्या मोर्चात सहभागी झालेल्यांवर हर्षवर्धन यांनी एक व्हिडिओ जारी करत चांगलीच आगपाखड केली.

Ex. Mla Harshvardhan Jadhav News, Aurangabad
Sanjana Jadhav News : मोर्चाला गर्दी, अन् जोरदार भाषणाने संजना जाधवांचे कमबॅक...

दारू आणि मटनासाठी गेल्या विधानसभेत वाटोळं करून घेतलं, आता पुन्हा तेच करू नका. मग डीपी दुरूस्त होत नाही, तलाठ्याला फोन करा म्हणत माझ्या दारात येवू नका, अशा भाषेत जाधव यांनी सुनावले. (Harshvardhan jadhav) मोर्चा काढून उपयोग काय झाला? शेतकऱ्यांना मदत मिळाली का ? गरीबांच्या खात्यात पैसे आले का? असा सवाल देखील त्यांनी केला. संजना जाधव यांच्या मोर्चानंतर कन्नड (Kannad) मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे.

मोर्चाला झालेली मोठी गर्दी आणि मिळालेला प्रतिसाद यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी जे लोक माझ्या मोर्चाला आले होते, तेच कालच्या मोर्चात देखील होते. दारू, मटन आणि गाडीसाठी चार हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

जाधव म्हणाले, ज्यांच्या हातात निर्णय घेवून मदत देण्याचा अधिकार आहे, ते न करता मोर्चे कसले काढता? मोर्चा काढाला पण त्यातून साध्य काय झाले ? भारत-पाकिस्तान किक्रेट सामन्यात भारताचे कपडे घालून पाकिस्तानचे गुणगाण गाण्यासारखाच प्रकार कालच्या मोर्चात झाला. दारु, मटन आणि पैशासाठी माझ्या मोर्चात जे लोक होते तेच कालही होते.

म्हणे आम्ही कन्नड पहायला गेलो होतो, कन्नड कधी पाहिले नव्हते का? यामुळेच गेल्या विधानसभेत नुकसान करून घेतले, आता पुन्हा तीच चूक करतायं. आता चुकीला माफी नाही. उद्या पुन्हा दादा आमचं चुकलं, माफ करा म्हणत माझ्या दारात येवू नका, असा सज्जड दम देखील त्यांनी भरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com