ऐकावे ते नवलच! पोलिसांनी जप्त केलेला 40 लाखांचा गुट्खा चोरीला..

पोलिसांच्या (Latur Police) ताब्यातील गुट्खा चोरीला गेल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Crime
CrimeSarkarnama

लातूर : लातूरात तीन महिन्यापूर्वी धडाकेबाज कारवाई करत सहाय्यक पोलिस अधिक्षक अनिकेत कदम (Aniket Kadam) यांनी धाड टाकून सहा गोदामातून तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. मात्र, जप्त केलेला हा गुट्खा सील करून ज्या ठिकाणी ठेवण्यात आला. त्या एमआयडीसी (MIDC) परिसरातील गोदाम फोडून चोरट्यांनी 40 लाख 15 हजार 32 रुपयांचा गुटका चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपींच्या शोधात पथके मात्र रवाना झाली आहेत. याबाबत रात्री एक वाजता लातुरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Video: अमोल कोल्हे हे शरद पोंक्षे नाहीत ; अमोल मिटकरींचा कोल्हेंना पाठिंबा

लातूर शहर पोलीस अधीक्षक (SP) ऑक्टोबर महिन्यात रजेवर गेल्यामुळे शहर हा पदभार सहाय्यक पोलिस अधिक्षक कदम यांच्याकडे देण्यात आला होता. या काळात कदम यांनी धडाकेबाज कारवाई करत गोलाई परिसरातील एका किराणा दुकानात कारवाई करीत सुरुवातीला अकरा लाखांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर याच दुकानाचा मालक यांच्या मालकीच्या शहरातील सहा गोदामात धाडी टाकून त्यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गुट्खा जप्त करून गुटखा माफियांना हादरा दिला होता तर विशेष बाब म्हणजे या तिघांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने हा जप्त केलेला सव्वा कोटी रुपयांचा गुट्खा सील करून एमआयडीसी परिसरातील प्लॉट नंबर 141 जागेतील पत्र्याच्या एका गोदामात ठेवला. या मालाची राखण करण्यासाठी पोलिस प्रशासनातील गार्डची ही नियुक्तही करण्यात आला होता. मात्र, चोरट्याची हिंमत इतकी की त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेला हा गुट्खा गोदामाचा पत्रा कापून चोरून नेला आहे, अशी माहिती सांगण्यात येत आहे.

Crime
नाराजी दूर करताना फडणवीसांची दमछाक; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व रात्री एक वाजता लातुर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले आहे. मात्र, पोलिसांच्या निगरानीमध्ये असलेल्या आणि पोलिसांनी जप्त केलेल्या गुट्खा चोरीला गेल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता यासंदर्भात चौकशीअंती काय समोर येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com