लातूरात सव्वा कोटींचा गुटखा जप्त; पोलिसांचा माफियांना दणका

(Latur Police Raid) या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल
लातूरात सव्वा कोटींचा गुटखा जप्त; पोलिसांचा माफियांना दणका
Niketan Kadam Police OfficerSarkarnama

लातूर ःगेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरांमध्ये छुप्या मार्गाने गोवा आणि अन्य गुटखा विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा मोठा धुमाकूळ वाढला होता. यावर पोलीस प्रशासनाकडून अंकुश ठेवणे देखील कठीण झाले होते. पण लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडली. तरी देखील कुटखा किंग, माफियांकडून विविध पळवाटा शोधल्या जात होता. त्यामुळे लातूर शहरात गुटख्याचा धंदा जोमात सुरू होता.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुप्त माहितीच्या आधारे पथक तयार केले होते. उपविभागीय पथकाने कारवाई करून तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत प्रेम मोरे, मोहिते, सावकार या तिघांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. लातूर शहरातील गांधी पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणावर धाडी टाकून ही कारवाई करण्यात आली.

१ कोटी २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील ३ प्रमुख आरोपी फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या तिन्ही फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.

Niketan Kadam Police Officer
गडकरींनी आमदार विनायक मेटेंच्या पाच पैकी चार मागण्या केल्या मान्य

येणाऱ्या काळामध्ये शहरांतील अवैध धंद्यावर आळा बसण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतील, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी निकेतन कदम यांनी लातूरकरांना दिला. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असो पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.