लातूर -गुलबर्गा रेल्वे औशातूनच हवी , पवारांची फडणवीसांकडे मागणी ; निलंगेकर बघतच राहिले..

हा रेल्वे मार्ग औशातूनच जावा यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी गळच त्यांनी फडणवीसांना घातली. (Abhimanyu Pawar)
Devendra Fadanvis, Mla Abhimanyu Pawar, Sambhaji Patil Nilangekar
Devendra Fadanvis, Mla Abhimanyu Pawar, Sambhaji Patil NilangekarSarkarnama

औसा : जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. (Bjp) परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे सूर जुळतायेत असे चित्र निर्माण झाले होते. (Latur) आता हे चित्र खरे की मग राज्याचे व दोघांचेही गाॅडफादर जिल्ह्यात येतायेत म्हणून दोघांनी जुळवून घेतले अशी देखील चर्चा या निमित्ताने सुरू होती.

आज प्रत्यक्ष कार्यक्रमात संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या अक्षरशः स्तुतीसुमने उधळली. ती एवढी होती की कार्यक्रमाला उपस्थितीत सर्वांच्या भुवया उंचावल्या. पण आमदार अभिमन्यू पवार यांनी मात्र संधी मिळताच निलंगेकर यांच्यावर कुरघोडी केली.

लातूर-गुलबर्गा या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण आपल्या निलंगा मतदारसंघातून व्हावे, यासाठी निलंगेकर गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. त्यांचे हे प्रयत्न सुरू असतांना आज पवार यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच लातूर-गुलबर्गा रेल्वे आपल्या औसा मतदारसंघातून न्यावी, अशी जाहीर मागणी केली. विशेष म्हणजे संभाजी पाटील यांच्या समोरच त्यांनी ही मागणी केल्याने स्वतः निलंगेकर हे देखील बघतच राहिले.

एकाच गुरुचे चेले असलेल्या या दोन नेत्यांमध्ये आॅल इज वेल नाही, हेच या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून आमदार अभिमन्यू पवार आणि माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातला वाद काहीकेल्या शमत नाहीये. २०१९च्या महाजनादेश यात्रेत फडणवीस यांच्या समोरच या दोघांचा कलगीतुरा रंगला होता. पुढे अभिमन्यू पवारांनी सेनेकडे असलेला औसा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे खेचून उमेदवारीही मिळवली.

Devendra Fadanvis, Mla Abhimanyu Pawar, Sambhaji Patil Nilangekar
औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी...पण ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादेतच हवा!

तेव्हा मात्र स्थानिक उमेदवार हवा या मुद्द्यावर भाजपच्या एका गटाने त्यांना टोकाचा विरोध केला होता. पवार निवडून आल्यावरही निलंगेकर आणि पवार यांच्यातले वैर वारंवार उफाळून आलेले दिसले. मात्र अभिमन्यू पवार यांच्या शेतरस्ते व मनरेंगातून ग्रामसमृद्धी योजनेतील कामाच्या लोकार्पण व उदघाटन सोहळ्यात संभाजी पाटील निलंगेकरांनी पवारांवर स्तुती सुमने उधळली. पवारांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे निलंगेकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाची पोस्ट आपल्या फेसबुक पेजवरून व्हायरल करत मैत्रीचा हात पुढे केला असे वाटत होते.

परंतु पवारांनी फडणवीसांकडे लातूर-गुलबर्गा रेल्वे संदर्भात केलेल्या मागणीने पुन्हा एकदा या दोन आमदारांमधील दरी वाढते की काय ? अशी शंका उपस्थीत केली जात आहे. लातूर गुलबर्गा रेल्वे मार्ग औशाहून न जाता तो निलंगा मार्गे घेऊन जाण्यासाठी निलंगेकर आग्रही आहेत. तर अभिमन्यू पवार यांना हा रेल्वे मार्ग आपल्या मतदारसंघातून न्यायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत ही संधी पवारांनी साधली व तशी थेट मागणीच केली.

हा रेल्वे मार्ग औशातूनच जावा यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी गळच त्यांनी फडणवीसांना घातली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर निलंगेकरांनी सुचविलेल्या मार्गापेक्ष्या औशाचा मार्गच कसा या भागातील जनतेला नैसर्गिक न्याय देणारा ठरेल हे देखील पटवून सांगितले. त्यामुळे ज्या अभिमन्यू पवारांची आपण भरभरून स्तुती केली, त्यांनीच अखेर डाव साधला असेच काहीसे भाव निलंगेकर यांच्या चेहऱ्यावर उमटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com