Gujarat Election Result: `ગુજરાતમાં વનવે છે` म्हणत पंकजा मुंडेंनी गुजरातीतून दिल्या शुभेच्छा..

Pankaja Munde : गोध्रा, कालोलसह अहमबादच्या अनेक मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी प्रचारसभा, काॅर्नर सभा घेतल्या होत्या.
Pankaja Munde Congratulat Modi-Saha News, Aurangabad
Pankaja Munde Congratulat Modi-Saha News, AurangabadSarkarnama

Bjp Victory News : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. Gujarat दीडशेहून अधिक जागांवर आघाडी घेत भाजपने जोरदार मुसंडी मारत काॅंग्रेससह आपचा सुफडा साफ केला आहे.

Pankaja Munde Congratulat Modi-Saha News, Aurangabad
Sanjay Raut On Gujrat Election : भाजप-आप मध्ये साटंलोटं झालंय का? राऊतांचा आरोप!

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर देखील गुजरातमधील अहमबादसह इतर शहरांमध्ये प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे पंकजा यांनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथले भाजपचे सगळे उमेदवार विजयी झाले आहेत. (Bjp) एकूणच गुजरातमध्ये भाजपने मिळवलेल्या विजयाचा एक भाग म्हणून पंकजा मुंडे यांना देखील अत्यानंद झाला आहे.

पण या विजयाचे खरे शिल्पकार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह गुजरात भाजपचे पंकजा यांनी खास गुजराती भाषेतून ट्विट करत अभिनंदन केले आहे. भाजपच्या या एकहाती विजयाचा उल्लेख करतांना पंकजा यांनी `ગુજરાતમાં વનવે છે` म्हणत ट्विट केले आहे.

पंकजा मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओंका बहोत बहोत अभिनंदन, गुजरात की जित एक इतिहास बना रही है, अभिनंदन मा. नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, जे.पी.नड्डाजी, भुपेंद्रजी, सी.आर. पाटीलजी आणि गुजरात भाजप प्रदेशचे देखील पंकजा यांनी अभिनंदन केले आहे.

पंकजा मुंडे या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अहमदाबादमध्ये गेल्या होत्या. गोध्रा, कालोलसह अहमबादच्या अनेक मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी प्रचारसभा, काॅर्नर सभा घेतल्या होत्या. या भागात देखील भाजपने घवघवीत यश मिळवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com