
Beed News : जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) अतुल सावे आज महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये आले होते. गेल्या महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान घातले होते. शेतक्यांची पीक, फळबागा, जनावरे, गोठे सगळंचे यात उद्धवस्त झाले होते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार येवून पाहणी करून गेले, पण जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे मात्र त्यांच्या शहरापासून अवघ्या १२० किलोमीटरवर असलेल्या बीडमध्ये आले नव्हते.
पालकमंत्री म्हणून त्यांनी तातडीने येवून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना दिलासा देणे गरजेचे होते. (Beed News) गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री हरवले आहेत, असे पोस्टर जिल्ह्यात काही ठिकाणी झळकले होते. अशावेळी महाराष्ट्रदिनाच्या ध्वजारोहणाच्या निमित्ताने का होईना, पालकमंत्र्यांचे पाय बीडला लागले. (Atul Save) ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली.
गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणीही केली. बैल दगावलेल्या एका शेतकऱ्याला ६४ हजारांची रोख मदतही जागेवर दिली. (Marathwada) हे सरकार जनतेचं आहे, जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणा, अशा शब्दही त्यांनी या निमित्ताने दिला. परंतु पालकमंत्र्यांनी हाच दिलासा गेल्यावेळी गारपीट आणि अवकाळीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा असता, तर त्यांच्याबद्दलचा रोष कमी झाला असता.
आज बीड दौऱ्यावर असलेल्या सावे यांनी सकाळपासूनच अवकाळी, गारपिटीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. तिप्पटवाडी येथील शेतपिकांसह वीज पडल्याने बैल दगावलेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी बैल दगावलेल्या शेतकरी अनंत शेंडगे यांना बांधावर जाऊन ६४ हजाराची मदतही देण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह नागरिकांनी घाबरू नये, शेतपिके घरांच्या पडझडीसह ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासनही सावे यांनी दिले. हे सरकार जनतेचे आहे, त्यामुळे जनतेच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाही. आता हा दिलासा आणि आश्वासन त्यांनी पुर्ण करावे, आणि हा त्यांचा दौरा औटघटकेचा न ठरता त्यांनी वारंवार येवून जिल्ह्याचे प्रश्न सोडवावेत अशी बीडकरांची अपेक्षा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.