Gram Panchayat Results : जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुाकांमध्ये राज्याचे माजी आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. राजेश टोपे यांच्या समर्थ ग्रामविकास पॅनलचा दणकून पराभव झाला आहे. टोपे यांच्या पॅनेलच्या विरोधात असलेल्या सतिश घाडगे पाटील यांच्या समृद्धी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. राजेश टोपे यांना त्यांच्याच पाथरवाला या गावात पराभव स्वीकारावा लागला.
सतिश घाडगे पाटील यांच्या समृद्धी विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवार सुमंबाई विठ्ठलराव सुडके यांच्याकडून टोपे यांच्या राष्ट्रवादी समर्थ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवा अनिता गंगाधर मरकड यांचा पराभव केला. राजेश टोपे यांना हा मोठा धक्का मानला जातो. 7 पैकी 5 जागांसह सरपंच घाडगे पाटलांच्या समृद्धी विकास परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय मिळवून, टोपे यांचा सपशेल पराभव केला.
दरम्यान, आज ग्रामपंचायतीसाठी निकाल जाहीर होत आहे. जवळपास ७१३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत, भाजप आणि शिंदे गट पुरस्कृत सरपंच आणि उमेदवारांमध्ये सर्वाधिक विजय मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडी मागे पडून दोन क्रमांकावर आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.