Gram Panchayat Result : जन्मभूमीत पुन्हा आमदार क्षीरसागरांनाच कल

Beed Political : संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविला.
Beed Grampanchayat Result News
Beed Grampanchayat Result NewsSarkarnama

Beed News : नवगण राजूरी म्हणजे एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र. दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यानंतर गावच्या व सर्कलच्या राजकारणाची सुत्रे त्यांचे पुत्र रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे राहीली. Gram Panchayat Result पुढे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय ठिणगीनंतर तिसऱ्यांदा राजूरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच बाजूने कल दिला दिला.

Beed Grampanchayat Result News
Gram Panchayat Result : मंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच..

ग्रामपंचायत निवडणुक निकालात मंगळवारी संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविला. (Mla Sandip Kshirsagr) जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांची राजकीय कारकिर्द देखील नवगण राजूरीच्या (ता. बीड) सरपंच म्हणूनच सुरु झाली. (Beed)

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे बीड तालुक्यातील नवगण राजूरी हे बाजारपेठेचे व जिल्हा परिषद सर्कलचे गाव. त्यामुळे गावाला मोठे राजकीय महत्व आहे. गावच्या ग्रामपंचायतीवर बहुदा क्षीरसागरांचेच प्रभूत्व राहीलेले आहे. दिवंगत केशरबाई क्षीरसागर देखील येथील सरपंच राहील्या. त्यांच्यानंतर ग्रामपंचायतीची सत्ता कायम त्यांचे चिरंजीव रविंद्र क्षीरसागर यांच्या अधिपत्याखाली राहीली.

त्यांच्यासह खुद्द त्यांच्या दिवंगत पत्नी व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांनी देखील येथील सरपंचपद सांभाळले. क्षीरसागर एकत्र असतानाही गावातील राजकीय विरोधकांनी त्यांना आव्हान दिले आणि काही प्रमाणात राजकीय यश देखील मिळविले. २०१६ पासून क्षीरसागरांत राजकीय दरी निर्माण झाली.

यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत गावातील मताधिक्य संदीप क्षीरसागर यांच्याच पारड्यात पडले. नंतर ग्रामपंचायत निवडणुकीत देखील संदीप क्षीरसागर गटाच्याच पॅनलने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत देखील तत्कालिन मंत्री व शिवसेनेचे बीड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनाच अधिक मते मिळाली.

Beed Grampanchayat Result News
Ajit Pawar - Devendra Fadnavis Criticize Each Other : कामांना स्थगिती देण्यावरून अजित पवार- फडणवीस आमने-सामने

आता देखील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीच्या विरोधात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पॅनल समोरा समोर होते. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय काकू - नाना रेखाताई विचार राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीच्या मंजूषा बनकर यांच्यासह इतर सदस्यपदाचे उमेदवार विजयी झाले. तर, तर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून नवगण परिवर्तन विकास आघाडीने अंबिका लगड या सरपंचपदाच्या उमेदवारासह सदस्यांचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com