High Court News : ग्रामपंचायत स्तरावरील माहिती मिळाली नाही, खंडपीठ आयुक्तांचे रिक्त पद तातडीने भरा..

Nanded : भूखंडांची दिशा बदलल्याची माहिती ही ग्रामसेवकाकडे माहिती अधिकारात कराळे यांनी मागितली.
Bombay High Court Bench News
Bombay High Court Bench NewsSarkarnama

Marathwada : ग्रामपंचायत स्तरावरील जागेच्या प्रश्नावरून याचिकाकर्त्याला मागितलेल्या माहितीसाठी ग्रामसेवक ते नंतरच्या सर्व अपिलीय अधिकाऱ्यांपर्यंत अर्ज करूनही माहिती मिळाली नाही. त्यामुळेच याचिकाकर्त्याने (High Court) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापर्यंत धाव घेतली.

Bombay High Court Bench News
Chandrakant Patil News : नॅक संलग्नतेसाठी मुदतवाढ मागितली तीन वर्षांची , मंत्र्यांनी दिली तीन महिन्यांची..

या प्रकरणी न्या. नितीन सांबरे व न्या. संतोष चपळगावकर यांनी रिक्त (Aurangabad) औरंगाबाद खंडपीठ माहिती आयुक्तांचे पद तातडीने भरून सर्वसामान्यांचा त्यामुळे होणारा त्रास राज्य सरकारने दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Marathwada)

शिराढोण (ता. कंधार, जि. नांदेड) येथील विजय गोविंदराव कराळे यांनी ॲड. गौतम कर्णे यांच्यामार्फत खंडपीठात रीट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते विजय कराळे यांनी त्यांच्या गावातील नमुना नंबर ८ मधील १२१८ ते १२५० या क्रमांकाच्या ३२ भूखंडांची दिशा बदलल्याची माहिती विचारली.

सरपंच व उपसरपंचांनी कोणत्या ठरावानुसार संबंधित भूखंडांची दिशा बदलल्याची माहिती ही ग्रामसेवकाकडे माहिती अधिकारात कराळे यांनी मागितली. ही माहिती न मिळाल्याने प्रथम अपिलीय अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांकडे ते गेले. त्यांच्याकडूनही माहिती मिळाली नाही. त्यामुळे कराळे यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले.

तेथूनही अपिलीय माहिती न मिळाल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठ आयुक्तांकडे अपिल दाखल केले. तेथेही निर्णय न झाल्याने विजय कराळे यांनी ॲड. कर्णे यांच्यामार्फत माहिती देण्याचे आदेश द्यावेत, अशी रीट याचिका दाखल केली. सुनावणीवेळी प्रतिवादींना नोटीस बजावून वरीलप्रमाणे पद भरण्याची अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com