Gram Panchayat Election : मुंडे भगनींनी नाही बजावला मतदानाचा हक्क...

Beed News : पंकजा मुंडे प्रकृती अस्वस्थतेमुळे, तर प्रीतम मुंडे संसदीय अधिवेशनामुळे मतदानाला येऊ शकल्या नाहीत.
Pankaja-Pritam Munde News, Beed
Pankaja-Pritam Munde News, BeedSarkarnama

Beed News : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही करण्यात येते. Gram Panchayat Election मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

Pankaja-Pritam Munde News, Beed
Beed News : सरपंच पदाच्या उमेदवाराच्या निशाणीसमोरील बटनावर फेविक्वीक टाकले..

रविवारी जिल्ह्यात साडेसहाशेंहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. (Pankaja Munde) नाथ्रा या त्यांच्या गावच्या ग्रामपंचायतीही निवडणुक होती. (Beed News) दहा वर्षांपासून धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या नाथ्रा ग्रामपंचायतीचे नऊ पैकी आठ सदस्य बिनविरोध निवडले गेले.

मात्र, सरपंचपदासाठी मुंडे भावंडांपैकीच धनंजय मुंडे यांच्या बाजूने असलेले अजय मुंडे यांचे भाऊ अभय मुंडे यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांच्यासह प्रकाश मुंडे आणि रमेश मुंडे या दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली.

त्यामुळे निवडणुकीला रंग आला होता. त्यामुळे दहा वर्षांपासून राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचाराच्या बॅनरवर एकत्र आले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी रविवारी पंकजा मुंडे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाला येऊ शकल्या नाहीत.

तर संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने खासदार डॉ. प्रितम मुंडे देखील मतदानाला येऊ शकल्या नाहीत, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. तर धनंजय मुंडे यांनी मात्र आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com